Supreme Court on Chandigarh Mayor Election: ही लोकशाहीची हत्याच; चंदीगड महापौर निवडणुकीवरून सुप्रीम कोर्टाची तीव्र नाराजी

Chandigarh Mayor Election: महापौरपदाच्या निवडणुकीशी संबंधित सर्व कागदपत्रे आणि व्हिडिओ रेकॉर्ड आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरलकडे सोपवण्याचे निर्देशही कोर्टाने दिले आहेत.
Supreme Court
Supreme Court Saam tv
Published On

Chandigarh Mayor Election:

चंदीगड महापौर निवडणूक प्रकरणाचा वाद सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे. यासंबंधी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर नाराजी व्यक्त करत ही लोकशाहीची हत्या असल्याचे म्हटले आहे. तसेच गरज पडल्यास पुन्हा निवडणूक घेण्याचे संकेत देत या महापौरपदाच्या निवडणुकीशी संबंधित सर्व कागदपत्रे आणि व्हिडिओ रेकॉर्ड आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरलकडे सोपवण्याचे निर्देशही कोर्टाने दिले आहेत.

सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?

नुकत्याच झालेल्या चंदीगड महापौर निवडणुकीवर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली असून ही लोकशाहीची हत्या असल्याचे म्हटले आहे. महापौरांच्या निवडणुका नीट पार पाडणे सर्वात महत्त्वाचे असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. आम आदमी पक्षातर्फे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी न्यायालयात सांगितले की नियुक्त रिटर्निंग ऑफिसर हा भाजपचा आहे. ते पक्षातही सक्रिय असल्याने त्यांना हे पद देण्यात आल्याचा गंभीर आरोप केला.

यावर न्यायालयाने अभिषेक मनू सिंघवी यांच्याकडील व्हिडिओ फुटेजचे पॅन ड्राइव्ह मागवले. व्हिडीओ पाहिल्यानंतर संताप व्यक्त करत "आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात यावा, ही लोकशाहीची हत्या करण्यासारखे आहे. ही लोकशाहीची चेष्टा आहे. रिटर्निंग अधिकाऱ्याचे हे वर्तन अयोग्य आहे असे CJI न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड म्हणाले.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Supreme Court
Akola News: शिवसेनेच्या माजी नगरसेवकाचा बांधकाम विभाग कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न; अकोल्यातील धक्कादायक प्रकार

सर्व कागदपत्रे जमा करण्याचे आदेश...

तसेच "कॅमेऱ्यात रिटर्निंग ऑफिसरची कृती दिसत आहे. रिटर्निंग ऑफिसर कॅमेऱ्याकडे बघत होते हे स्पष्ट दिसले. ते कॅमेराकडे का पाहत होते ? त्याचे (ऑफिसरचे) वर्तन संशयास्पद आहे, " असे म्हणत महापौरपदाच्या निवडणुकीशी संबंधित सर्व कागदपत्रे आणि व्हिडिओ रेकॉर्ड आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरलकडे सोपवण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. (Latest Marathi News)

Supreme Court
Pune News: पुण्याच्या वाहतूक कोंडीची अख्ख्या जगात चर्चा; Traffic Jam असलेल्या टॉप १० शहरांमध्ये समावेश

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com