Akola News: शिवसेनेच्या माजी नगरसेवकाचा बांधकाम विभाग कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न; अकोल्यातील धक्कादायक प्रकार

Akola Latest News: उपोषणकर्ते माजी नगरसेवक मंगेश काळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता यांच्या कार्यालयात थेट अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.
Akola Latest News
Akola Latest NewsSaamtv
Published On

अक्षय गवळी, अकोला|ता. ५ फेब्रुवारी २०२४

Akola Breaking News:

शिवसेनेचे माजी नगरसेवक मंगेश काळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागात आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंगेश काळे यांनी अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी स्थानिक आमदार नितीन देशमुख यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत अडवल्याने मोठा अनर्थ टळला.

नेमकं काय घडलं?

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अकोला (Akola) शहरातल्या तुकाराम चौक ते मलकापूर रस्त्याच्या अतिशय दयनीय अवस्थेकड लक्ष वेधून त्याचे काम तातडीने सुरु करण्यात यावे, या मागणीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मंगेश काळे मित्रमंडळ व 'निर्भय बनो जन आंदोलन'च्या वतीने गेल्या सात दिवसांपासून बेमुदत सुरू आहे.

मात्र सात दिवस उलटूनही तोडगा न निघाल्याने उपोषणकर्ते माजी नगरसेवक मंगेश काळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता यांच्या कार्यालयात थेट अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी स्थानिक आमदार नितिन देशमुख यांनी हातातील मॅचबॉक्स हिसकावून घेतला अन् पुढील अनर्थ टळला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Akola Latest News
Wardha NCP : हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात गटबाजी, राष्ट्रवादीच्या प्रदेश सचिवांसह सहका-यांवर गुन्हा दाखल

दरम्यान, हा रस्ता त्वरीत व्हावा म्हणून शासन, प्रशासनास जन प्रतिनिधी यांना पाचवेळा निवेदन दिले आहेत. तसेच अनेकवेळा आंदोलने केली आहेत. परंतु शासनाने आश्वासने देऊन आंदोलने संपवली परंतु तुकाराम चौक ते मलकापूर या अर्धा किलोमीटरच्या रस्त्याचे काम अद्याप पर्यंत पूर्ण न झाल्यामुळे हा पवित्रा उचलावा लागला असल्याचे मंगेश काळे म्हणाले. (Latest Marathi News)

Akola Latest News
Amravati Lok Sabha Constituency : ...तर मी राजकारणातून संन्यास घेईन : डाॅ. राजेंद्र गवई

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com