Pune News: पुण्याच्या वाहतूक कोंडीची अख्ख्या जगात चर्चा; Traffic Jam असलेल्या टॉप १० शहरांमध्ये समावेश

Tomtom Traffic Index 2023 : जगभरात पुणे शहर हे सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या शहरांमध्ये सातव्या क्रमांकावर आहे. तर देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
Pune News
Pune NewsSaam Tv
Published On

विद्येचे माहेरघर म्हणून पुणे शहराला जगभरात ओळखले जाते. शिक्षणासोबतच आता सर्वात जास्त गजबजलेल्या शहरातदेखील पुणे शहराचा नंबर अव्वल आहे. जगातील गजबजलेल्या शहरांमध्ये पुणे शहराचा सातवा क्रमांक आहे.

जगातील ५५ देशांतील ३८७ शहरांच्या वाहतुक कोंडीचा अहवाल नुकताच समोर आला आहे. ज्यामध्ये जगभरात पुणे शहर हे सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या शहरांमध्ये सातव्या क्रमांकावर आहे. तर देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Tomtom Traffic Index ( Tomtom Traffic Index 2023 ) च्या अभ्यासानुसार, पुणे आणि बंगळुरू जगातील 10 सर्वाधिक वाहतूक कोंडीच्या शहरांपैकी एक आहेत. गेल्या वर्षी, पुण्यात १० किलोमीटर अंतर कापण्यासाठी सरासरी वेळ हा २७ मिनिटे आणि ५० सेकंद लागत होता. यात आता वाढ झाली आहे. तर नवी दिल्ली ट्राफिकबाबत ४४ व्या क्रमांकावर आहे, दिल्लीत १० किमीचे अंतर कापण्यासाठी सुमारे २१ मिनिटे आणि ४० सेकंद लागतात.

टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्सच्या अहवालानुसार, 2023 मध्ये पुणे आणि बंगळुरू जगातील सर्वाधिक गर्दी असलेल्या प्रमुख १० शहरांच्या यादीत होते. या यादीत जागतिक स्तरावर बेंगळुरू सहाव्या तर पुणे सातव्या क्रमांकावर आहे. या अहवालानुसार वाहतूक कोंडीच्या जागतिक क्रमवारीत दिल्ली ४४ तर मुंबई ५४व्या स्थानावर आहे.

Pune News
Mahesh Gaikwad: ICUमध्ये उपचार घेत असलेल्या महेश गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

२०२३ च्या टॉमटॉम अहवालानुसार, पुण्यातील एका प्रवाशाने गर्दीच्या वेळी सरासरी २५६ तास ड्रायव्हिंग केले. वाहतूक कोंडीमुळे त्याचे तब्बल १२८ तास वाया गेले. यामुळे अंदाजे १ हजार ७ किलो कार्बनचे उत्सर्जंन होऊन प्रदुषण वाढले.नवी दिल्लीतील प्रवाशांनी १९१ तास, मुंबई १९८ तास आणि बंगळुरू २५७ तास ड्रायव्हिंग केले. यात त्यांनी अनुक्रमे ८१, ९२ आणि १३२ तास वाहतूक कोंडीत गमावले.

Pune News
Goa Crime News : गाेव्यात ज्येष्ठ नागरिकाचा खून, युवतीसह युवकाने नवी मुंबई पाेलिसांना दिली गुन्ह्याची कबुली

५५ देशांमधील ३८७ शहरांमध्ये केलेल्या या अभ्यासानुसार, लंडन हे सर्वाधिक गर्दीचे शहर आहे. १० मिनिटांच्या प्रवासासाठी लंडनमध्ये ३७ मिनिटे आणि २० सेकंद लागत होते. लंडननंतर डब्लिन येथे १० किमी अंतर कापण्यासाठी २९ मिनिटे लागत. तर टोरंटो येथे १० किमी अंतर कापण्यासाठी २९ मिनिटे ३० सेकंद लागतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com