Atiq Ahmed Shot Dead Case: अतिक-अश्रफ हत्येनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पत्रकारांच्या सुरक्षेसाठी तयार करणार SOP

Latest News: अतिक-अशरफची हत्या करणारे तिन्ही तरुण मीडिया रिपोर्टर (Media Reporter) असल्याचे भासवून जमावात सहभागी झाले होते.
Amit Shah
Amit Shah Saam Tv
Published On

Delhi News: उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये गँगस्टर अतिक अहमद (Atiq Ahmed) आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद (Ashraf Ahmed) यांची हत्या करण्यात आली. तीन तरुणांनी अतिक आणि अशरफची गोळ्या झाडून हत्या केली. त्यांच्या हत्येनंतर आता केंद्र सरकार अलर्ट मोडवर आले आहे.

अतिक-अशरफची हत्या करणारे तिन्ही तरुण मीडिया रिपोर्टर (Media Reporter) असल्याचे भासवून जमावात सहभागी झाले होते. त्यानंतर त्यांनी अतिक-अशरफवर गोळ्या झाडल्या. अशामध्ये आता पत्रकारांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने (Central Government) मोठे पाऊल उचलले आहे.

Amit Shah
Sanjay Raut on Sharad Pawar: 'भाजपात जाण्यासाठी कुटुंबियांवर दबाव, सिल्व्हर ओकवरील बैठकीत शरद पवारांचं वक्तव्य,' राऊतांचा गौप्यस्फोट

अतिक अहमद आणि अशरफ अहमदच्या हत्येनंतर आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृह मंत्रालय पत्रकारांच्या सुरक्षेसाठी एसओपी तयार करणार आहे. पत्रकारांना सुरक्षा देण्यासाठी गृहमंत्रालयाकडून हे पाऊल उचलले जात आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या मार्गदर्शनाखाली गृह मंत्रालय (MHA) पत्रकारांच्या सुरक्षेसाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP) तयार करणार आहे.

Amit Shah
Sudan War: सुदानमध्ये लष्कर-निमलष्करी दलात गृहयुद्ध, एका भारतीयासह 56 जण ठार; परराष्ट्र मंत्रालयाने जारी केली अॅडव्हायझरी

गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पोलिसांनी प्रयागराजच्या काल्विन हॉस्पिटलमध्ये दोघांना वैद्यकीय तपासणीसाठी आणले होते. अतिक आणि अशरफ मीडियाशी बोलत होते. त्याचवेळी तिन्ही आरोपी रिपोर्टर असल्याचे भासवत तिथे आले आणि त्यांनी अतिक आणि अशरफ यांच्यावर गोळ्या झाडल्या. तब्बल 9 ते 10 सेकंदापर्यंत ते गोळ्या झाडत होते.

Amit Shah
Atiq Ahmed Case: गँगस्टर अतिक- अशरफच्या हत्येप्रकरणी 17 पोलिसांचे निलंबन, उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट जारी!

अतिक आणि अशरफची हत्या केल्यानंतर तिन्ही आरोपी स्वत:हून पोलिसांसमोर शरण आले. लवलेश, सनी आणि अरूण अशी तिन्ही आरोपींची नावं आहेत. पोलिसांनी हल्लेखोरांकडून तीन पिस्तूल, जिवंत काडतूसे, एक कॅमेरा आणि बूम जप्त केला आहे. पोलिसांकडून आरोपींची कसून चौकशी सुरु आहे.

आरोपींनी पोलिसांना सांगितले की, त्यांना अतिक-अशरफ टोळीचा नायनाट करायचा होता. जेणेकरून त्यांचे राज्यात नाव होईल. तिघांना पोलिसांच्या घेरावाचा अंदाज आला नाही आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे ते पकडले गेले. ते गेल्या अनेक दिवसांपासून अतिक आणि अशरफला मारण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यांना योग्य वेळ किंवा संधी मिळाली नव्हती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com