Sudan War: उत्तर आफ्रिकेमधील देश सुदानमध्ये लष्कर आणि निमलष्करी दलातील युद्ध तीव्र झालं आहे. सुदानची राजधानी खार्तूमसह अनेक शहरांमध्ये जाळपोळ आणि गोळीबाराच्या घटना समोर येत आहेत. गृहयुद्धाच्या दरम्यान सुदान हिंसाचारात आतापर्यंत किमान 56 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 590 हून अधिक जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे.
एका भारतीयाचा मृत्यू
खार्टूनमध्ये एका भारतीय रहिवाशाचाही मृत्यू झाला आहे. भारत सरकारने या घटनेची दखल घेतली आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी रविवारी सुदानमधील खार्तूम येथील एका कंपनीत काम करणाऱ्या भारतीय नागरिकाच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. यासोबतच भारत सरकारने सुदानमध्ये राहणाऱ्या आणि सुदानला जाणाऱ्या भारतीयांसाठी एक अॅडव्हायजरी जारी केली आहे.
सुदान गृहयुद्धावर परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, खार्तूममध्ये एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्याची बातमी ऐकून खूप दु:ख झाले. दूतावास कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्यासाठी प्रयत्न करत आहे. खार्तूममधील परिस्थिती ही अत्यंत चिंतेची बाब आहे. आम्ही घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. (Latest Marathi News)
गृहयुद्धात मृत्यू झालेले भारतीय कोण होते?
सुदान गृहयुद्धात मृत्यू झालेल्या भारतीय नागरिकाचे नाव अल्बर्ट ऑगस्टीन असे आहे. सुदानमधील भारतीय दूतावासाने ट्वीट केले की, "अल्बर्ट ऑगस्टीन हे सुदानमधील एका कंपनीत काम करणारे भारतीय नागरिक आहे. काल गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला. पुढील व्यवस्था करण्यासाठी कुटुंब वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे.”
भारतीयांसाठी अॅडव्हायझरी जारी
सुदानमधील भारतीय दूतावासाने सुदानला जाण्याची योजना आखत असलेल्या भारतीयांना सध्या येथे येऊ नये , असे आवाहन केले आहे. भारतीय दूतावासाने देशवासियांना सुदानला जाण्याची योजना पुढे ढकलण्याचे आवाहन केले आहे. शनिवारी एका ट्विटमध्ये भारतीय दूतावासाने लिहिले की, "सुदानला भेट देण्याची योजना आखत असलेल्या भारतीयांनी त्यांचा प्रवास पुढे ढकलला पाहिजे. कृपया अपडेट्सची प्रतीक्षा करा."
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.