Indigo Flight Tickets: केंद्र सरकारचा मोठा निर्णय! विमानाच्या तिकीट दरात वाढ न करण्याचे निर्देश; अन्यथा होणार कारवाई

Central Government on Flight Ticket Increasing News: केंद्र सरकारने विमानाच्या तिकीट दराबाबत महत्त्वचा निर्णय घेतला आहे. आता कंपन्यांना तिकीट दर न वाढवण्याचे निर्देश दिले आहेत.
Indigo Flight Tickets
Indigo Flight TicketsSaam Tv
Published On
Summary

केंद्र सरकारचा मोठा निर्णय

आता विमान तिकीट दरात वाढ न करण्याचे निर्देश

जर कंपन्यांनी तिकीट दर वाढवले तर कारवाई होणार

इंडिगो कंपनीमुळे सध्या प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.इंडिगो कंपनीची अनेक विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहे. अनेक विमाने उशिराने धावत आहेत. यामुळे प्रवाशांना तासनतास एअरपोर्टवर थांबावे लागत आहे. दरम्यान, प्रवाशांच्या या परिस्थितीचा इतर विमान कंपन्यांनी गैरफायदा घेतला आहे. इतर कंपन्यांच्या विमान तिकीटात खूप जास्त वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, आता या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी नागरी उड्डाण मंत्रालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Indigo Flight Tickets
Bomb Threat on Indigo Flight: विमानात मानवी बॉम्बची धमकी; ईमेल मिळताच इंडिगो फ्लाइटचं मुंबई एअरपोर्टवर आपत्कालीन लँडिंग

केंद्र सरकारने विमान कंपन्यांना प्रवाशांकडून निर्धारित किंमतीपेक्षा जास्त भाडे न आकारण्याचे निर्देश जारी केले आहे. जर विमान कंपन्यांनी जास्त भाडे आकारले तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असं सरकारने म्हटलं आहे.

इंडिगोच्या कामकाजातील त्रुटींमुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी विमान भाड्यातही मोठी वाढ झाली आहे. विमानाचे योग्य भाडे सुनिश्चित करण्यासाठी नियामक अधिकाऱ्यांचा वापर केला आहे, असं मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

Indigo Flight Tickets
IndiGo Flight: मुंबई-दिल्ली, मुंबई-पुणे, विमानाचे तिकीट ५०-६० हजारांवर; एअरलाइन्स कंपन्यांकडून लुटमार सुरू

केंद्र सकारने जाहीर केले की, सर्व विमान कंपन्यांना भाडे मर्यादेचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. मंत्रालयाच्या निवेदनुसार, परिस्थिती स्थिर होईपर्यंत या मर्यादा लागू राहणार आहेत. यामागचे उद्दिष्ट म्हणजे प्रवाशांकडून कोणत्याही प्रकारचे जास्त भाडे आकारले जाऊ नये, कोणत्याही आप्तकालीन काळात प्रवास करणाऱ्यांना आर्थिक अडचणींना सामना करावा लागू नये.

Indigo Flight Tickets
Modi Government: मोदी सरकारच्या प्रशासकीय रचनेत मोठे बदल; राजभवनांसह PMOचं नाव बदललं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com