पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्राकडून ७०० कोटींची मदत जाहीर

या पुराचा फटका अनेक भागातील शेतीलाही बसला आहे.
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्राकडून ७०० कोटींची मदत जाहीर
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्राकडून ७०० कोटींची मदत जाहीरSaam Tv
Published On

नवी दिल्ली - कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर Narendra Singh Tomar यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी Farmer मदत जाहीर केली आहे. मोदी सरकारने Central Government शेतकऱ्यांसाठी जवळपास ७०० कोटी रुपयांची मदत मंजूर केली आहे अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी दिली आहे.

राज्यात मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे Rain Flood पूरस्थिती निर्माण झाली होती. या पुराचा फटका अनेक भागातील शेतीलाही बसला आहे. पुराचे पाणी शेतात घुसल्याने पिके वाहून गेली. शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे शेतीचा कस निघून गेला आहे त्यांमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

हे देखील पहा -

लोकसभेमध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना नरेंद्रसिंह तोमर यांनी महाराष्ट्राला ७०० कोटींच्या मदतीची माहिती दिली. महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारने ७०० कोटी रुपयांची मदत मंजूर केली आहे. शेतकऱ्यांना ही मदत पीक विमा योजनेअंतर्गत मदत दिली जाणार असल्याचे नरेंद्रसिंह तोमर म्हणले. मागील आठवड्यात महाराष्ट्रात पाऊस झाला त्यासोबतच कोकणात देखील विविध शहरात महापूर आला. या महापूरमध्ये तब्बल ११० हून अधिक जणांचा मृत्यू झाला.

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्राकडून ७०० कोटींची मदत जाहीर
शेतकऱ्यांचे वीजपंप चोरणाऱ्यांना बेड्या

चिपळूण तर कित्येक तास पाण्याखाली होते. रायगडच्या तळीये गावात दरड कोसळून खूप मोठी जीवितहानी झाली अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला अनेक लोकांच्या घराचे आणि शेतीचे नुकसान झाले. या पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आज अधिवेशनात कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ७०० कोटींची मदत जाहीर केली आहे. लोकसभेमध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना नरेंद्रसिंह तोमर यांनी ही माहिती दिली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com