शेतकऱ्यांचे वीजपंप चोरणाऱ्यांना बेड्या

कर्जत पोलिसांनी चोरांकडून वीज पंप जप्त केले.
कर्जत पोलिसांनी चोरांकडून वीज पंप जप्त केले.
Published On

अहमदनगर ः गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांचे वीजपंप चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले आहे. बोअरवेलमधील मोटारीही चोरीस गेल्या आहेत. भुरट्या चोरांमुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहेत.

कर्जतमधील बाळू काशिनाथ जगधने व अजिनाथ काशिनाथ जगधने यांच्या पाणी उपसा करणाऱ्या तीन मोटरी चोरी गेल्या होत्या. या मोटरीचा शोध न लागल्याने जगधने (राहणार मुळेवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर) यांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मोटर चोरीबाबत कर्जत पोलिसांना गुप्त बातमीदार यामार्फत माहिती मिळाली होती. त्यानुसार सदर मोटरी ह्या देवा मोहन वायसे (रा. मुळेवाडी) याने चोरी करून शब्बीर महबूब शेख, (रा. मिरजगाव, तालुका कर्जत) यांचेकडे दिल्या आहेत, अशी माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तात्काळ पोलीस अंमलदार प्रबोध हंचे, भाऊसाहेब यमगर, श्याम जाधव यांना मिरजगाव येथे पाठवून त्या ठिकाणी खात्री केली. तेथे शब्बीर महबूब शेख (राहणार मिरजगाव) याच्या ताब्यातील मुळेवाडी येथील चोरीच्या तीन पाणी उपसा मोटारी आढळून आल्या. शब्बीर शेखकडे विचारपूस केली असता त्याने सांगितले की, देवा मोहन वायसेने मोटर आणून विकल्या असल्याचे सांगितले.Karjat police caught a gang stealing electricity pumps

कर्जत पोलिसांनी चोरांकडून वीज पंप जप्त केले.
विनातिकिट, फुल्ल टेन्शन! सापाचा भिंवडी ते कल्याण प्रवास

सदर गुन्ह्यात आरोपी शब्बीर महबूब शेख (रा. मिरजगाव, ता. कर्जत) याला अटक करण्यात आली आहे. देवा मोहन वायसे (रा. मुळेवाडी, तालुका कर्जत) हा फरार आहे. त्याचा शोध घेण्याचे काम कर्जत पोलिसांकडून सुरू आहे.Karjat police caught a gang stealing electricity pumps

तपास हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील साहेब, अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोउपनिरीक्षक रमेश साळुंखे, सपोनि सुरेश माने, पोलीस अंमलदार प्रबोध हंचे, भाऊसाहेब यमगर, सुनील मालशिखरे श्याम जाधव, विकास चंदन, अमित बर्डे, सुनील खैरे यांनी तपास केला.

Edited By - Ashok Nimbalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com