CBSE Exam: विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! CBSE च्या १० वी आणि १२ वीच्या प्रात्यक्षिक परीक्षांच्या तारखा जाहीर, कुठे चेक कराल?

10th And 12th CBSE Board Exam Date: सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. या विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तयारीला लागावे कारण त्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.
CBSE Exam: विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! CBSE च्या १० वी आणि १२ वीच्या प्रात्यक्षिक परीक्षांच्या तारखा जाहीर, कुठे चेक कराल?
10th And 12th CBSE Board ExamSaam Tv News
Published On

Summary -

  • सीबीएसईने दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

  • परीक्षा १७ फेब्रुवारी ते ४ एप्रिल २०२५ दरम्यान घेण्यात येणार

  • हिवाळा झोनसाठी प्रात्यक्षिक परीक्षा ६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२५ दरम्यान होणार

केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड म्हणजेच सीबीएसई बोर्डाने २०२५-२६ या शैक्षणिक सत्रासाठी प्रात्यक्षिक परीक्षेसाठीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे वेळापत्रक सीबीएसईच्या अधिकृत वेबसाईट cbse.gov.in वर प्रसिद्ध करण्यात आले आहे. सीबीएसईची दहावी आणि बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा १७ फेब्रुवारी ते ४ एप्रिल २०२५ दरम्यान घेतल्या जाणार आहेत.

सीबीएसई बोर्डाने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, थंडी असलेल्या झोनमधील शाळा जानेवारीपूर्वी ६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर दरम्यान त्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा पूर्ण करू शकतात. थंडी नसलेल्या झोनसाठी या परीक्षा १ जानेवारी २०२६ पासून सुरू होतील. २९ ऑक्टोबरपर्यंत दिवाळी आणि छठ हे सण संपत आहेत. त्यानंतरच सीबीएसईच्या परीक्षा सुरू होतील. सीबीएसईने जारी केलेल्या वेळापत्रकानुसार, नोव्हेंबर २०२५ च्या पहिल्या आठवड्यापासून प्रॅक्टीकल परीक्षा, प्रोजेक्ट, इंटरनल असेसमेंट्स सुरू होतील.

CBSE Exam: विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! CBSE च्या १० वी आणि १२ वीच्या प्रात्यक्षिक परीक्षांच्या तारखा जाहीर, कुठे चेक कराल?
CBSE बोर्डाचा मोठा निर्णय! शाळेतच स्थापन करणार 'शुगर बोर्ड', मुलांमध्ये वाढती डायबिटीज लक्षात घेता पाऊल

सीबीएसई बोर्डाने शाळांना विद्यार्थ्यांच्या यादी तयार करण्याचे आणि बाह्य परीक्षक आणि पर्यवेक्षकांसाठी प्रादेशिक अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्याचे निर्देश दिले आहेत. सीबीएसईने हे देखील स्पष्ट केले की, दहावीसाठी अंतर्गत मूल्यांकन फक्त एकदाच घेतले जाईल. प्रयोगशाळेच्या उपलब्धतेनुसार प्रॅक्टिकल परीक्षा अनेक सत्रांमध्ये घेतल्या जाऊ शकतात. एकदा गुण अपलोड झाल्यानंतर कोणतेही बदल करण्यास परवानगी दिली जाणार नाही.

CBSE Exam: विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! CBSE च्या १० वी आणि १२ वीच्या प्रात्यक्षिक परीक्षांच्या तारखा जाहीर, कुठे चेक कराल?
CBSE Board 10th Result 2024: CBSE १० वीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली; परीक्षेचा निकाल जाहीर

दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांनी वेळापत्रक कसे तपासावे -

- सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in ला भेट द्या.

- आता मुख्य वेबसाइट लिंकवर जा.

- होम पेजवर दिलेल्या विंटर-बाउंड स्कूल प्रॅक्टिकल डेटशीट लिंकवर क्लिक करा.

- तुमच्या स्क्रीनवर वेळापत्रक दिसेल.

- वेळापत्रक तपासा आणि प्रिंटआउट काढून घ्या.

सीबीएसईने जारी केलेल्या वेळापत्रकानुसार, दहावी आणि बारावीच्या सिद्धांत परीक्षा १७ फेब्रुवारीपासून सुरू होतील. दहावीच्या बोर्ड परीक्षा ९ मार्च रोजी संपतील. तर बारावीच्या परीक्षा ९ एप्रिल रोजी संपतील. दहावीची परीक्षा १७ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:३० ते दुपारी १:३० या वेळेत घेतल्या जातील. तर बारावीच्या परीक्षा १७ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:३० ते दुपारी १:३० या वेळेत घेतल्या जातील. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

CBSE Exam: विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! CBSE च्या १० वी आणि १२ वीच्या प्रात्यक्षिक परीक्षांच्या तारखा जाहीर, कुठे चेक कराल?
CBSE Class 10 Exam Pattern Change : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, प्रमुख विषयांच्या परीक्षेत महत्वाचे बदल, वाचा सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com