
सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षेसाठी २०२६ पासून प्रमुख विषयांमध्ये महत्त्वाचे बदल
विज्ञानाचा पेपर तीन विभागला आहे.
समाजशास्त्र पेपर चार भागात विभागला असून ३८ प्रश्न विचारले जाणार
गणिताच्या पेपरमध्ये कोणताही बदल नाही
CBSE Class 10 Exam Pattern Change : सीबीएसई बोर्डाची दहावीची परीक्षा १५ फेब्रुवारी २०२६ पासून सुरु होणार आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासाठी अवघे काही महिनेच थांबले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना सीबीएसईच्या Revised परीक्षेचा पॅटर्न माहीत गरजेचे आहे.
विज्ञान, समाजशास्त्रासहित प्रमुख विषयांच्या पेपर पॅटर्नमध्ये बदल करण्यात आले आहेत. या पेपरमधील संपूर्ण बदल जाणून घेऊयात.
बोर्डाच्या परीक्षा पॅटर्नमध्ये मोठा बदल)
CBSE 2025-26 या बोर्डाच्या परीक्षेसाठी १० वीचा गणिताच्या पेपर हा मागील वर्षाच्या पॅटर्नसारखा असेल. त्यात कोणताही बदल झालेला नाही. बेसिक आणि स्टँडर्ड गणित या दोन्ही पेपरसाठी परीक्षेचा पॅटर्न सारखा असेल.
२०२६ च्या बोर्डाच्या परीक्षेचा सीबीएसईच्या १० वीच्या विज्ञानाच्या पेपर हा मागील वर्षीच्या पेपर पॅटर्न २०२४-२५ या सालापेक्षा वेगळा असेल. प्रश्न पत्रिका तीन विषयांमध्ये विभागण्यात आली आहे. 'बायोलॉजी', 'केमिस्ट्री' 'फिजिक्स' असे तीन विषय आहेत. त्यात 'फिजिक्स' आणि 'बायोलॉजी' या दोन विषयांना अधिक महत्व देण्यात आलं आहे. केमिस्ट्री आणि फिजिक्स या विषयांच्या प्रश्नांना एक सारखे गुण देण्यात आले आहेत .
सेक्शन ए - बायोलॉजी (प्रश्न १ ते प्रश्न १६) ३० गुण
सेक्शन बी - केमिस्ट्री (प्रश्न १७ ते प्रश्न २९) २५ गुण
सेक्शन सी - फिजिक्स (प्रश्न ३० ते प्रश्न ३९) २५ गुण
सीबीएसईच्या दहावीच्या समाजशास्त्राच्या परीक्षा पॅटर्नमध्ये बदल करण्यात आला आहे. समाजशास्त्रात इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र आणि अर्थशास्त्र असे विषय आहेत. या परीक्षेत एकूण ३८ प्रश्न विचारले जातील. या विषयाचा पेपर चार भागात विभागण्यात आला आहे. प्रत्येक भागासाठी २० गुण असतील.
यंदाची बोर्डाची परीक्षेत इंग्रजी विषयाचा पेपर ८० गुणांसाठी प्रश्न विचारले जातील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.