CBSC Students : विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आता पुस्तकं पाहून द्या परीक्षा

CBSC Board News Rules : इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना पुस्तकं बघून परीक्षा देता येणार आहे.. नेमका CBSE नं काय निर्णय घेतलाय? ही परीक्षा कशी होणार? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
CBSC Students
CBSC Studentsx
Published On

CBSC Open Book Exam : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच CBSE नं 2026-27 या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 9 वीमध्ये ओपन-बुक परीक्षा घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिलीय. CBSE च्या सर्वोच्च निर्णय घेणाऱ्या गव्हर्निंग बॉडीने जून महिन्यात झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर केलाय. त्यामुळे 9 वीमध्ये दर सत्रात होणाऱ्या तीन पेपरमध्ये ओपन बुक परीक्षा पद्धती राबवली जाईल. या परीक्षा पद्धतीची चाचणी कशी करण्यात आली आणि आता CBSE ओपन बुक परीक्षा कशी घेणार? पाहूयात

पुस्तक घेऊन परिक्षेला बसा!

  • NEP 2020 आणि NCFSE 2023 यांच्या अंतर्गत निर्णय

  • CBSE ने 2023 मध्ये पथदर्शी प्रकल्पात या पद्धतीची चाचणी केली

  • चाचणीत विद्यार्थ्यांचे गुण 12 % ते 47 % पर्यंत नोंदवले

  • शिक्षकांकडूनही परीक्षा पद्धतीला सकारात्मक प्रतिसाद

  • गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र विषयाच्या परीक्षा ओपन बुक पद्धतीने होणार

  • विद्यार्थ्यांना परीक्षेत पाठ्यपुस्तके, इतर संदर्भ साहित्य वापरण्याची मुभा

CBSC Students
Maharashtra Politics : मुंबईत शिंदे गटाला मोठा हादरा, बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

दरम्यान या परीक्षा पद्धतीमुळे परीक्षेत रट्टा मारण्याऐवजी वेगवेगळ्या विषयातील संकल्पना समजून घेणं आणि विश्लेषणात्मक कौशल्यांवर भर दिला जाईल. तसचं यामुळे विद्यार्थ्यांचा ताण कमी होऊन, वास्तविक जीवनातील समस्यांवर आधारित विचारक्षमता वाढेल, असा दावा CBSE कडून केला जातोय. मात्र आतापर्यंत रट्टा मारून प्रश्न सोडवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठीही ही परीक्षा पद्धती आव्हानात्मक ठरू शकते... याआधीही 2014 मध्ये CBSE ने अशा पद्धतीनं परीक्षा घेतली होती..मात्र कालांतरानं ही पद्धत बंद करण्यात आली.. आता ओपन बुक परीक्षा विद्यार्थ्यांसाठी किती फायदेशीर ठरते.. याकडे पालकांचं आणि शिक्षकांचं लक्ष लागलयं...

CBSC Students
Dharashiv : महाराजांच्या भक्तीला विरोध केला, पोटच्या पोरानं जन्मदात्या वडिलांना संपवलं; धाराशिवमध्ये खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com