Dharashiv : महाराजांच्या भक्तीला विरोध केला, पोटच्या पोरानं जन्मदात्या वडिलांना संपवलं; धाराशिवमध्ये खळबळ

Dharashiv Crime : भक्तीच्या वादातून एका तरुणाने त्याच्या वडिलांनी संपवल्याची घटना धाराशिवच्या पळसप येथे घडली आहे. या प्रकरणीतील आरोपी तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.
Dharashiv Crime
Dharashiv Crimesaam tv
Published On
  • धाराशिवच्या पळसपमध्ये भक्तीवरून वाद झाला.

  • भक्तीला विरोध केल्याने मुलाने जन्मदात्या वडिलांचा खून केला.

  • या प्रकरणात पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.

बालाजी सुरवसे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Dharashiv Crime News : धाराशिवमधून एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. एका महाराजांच्या भक्तीला विरोध केल्याने एका तरुणाने त्याच्या जन्मदात्या वडिलांची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. ही घटना धाराशिव जिल्ह्यातील पळसप येथे घडल्याची माहिती समोर आली आहे.

रामपाल महाराज यांच्या भक्तीला विरोध केल्याने पोटच्या पोराने जन्मदात्या बापाचा खून केल्याची घटना धाराशिवमध्ये घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. मुलाने त्याच्या वडिलांच्या डोक्यात खोऱ्याच्या दांड्याने जोरात वार केला होता. वडिलांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Dharashiv Crime
Maharashtra Politics : मुंबईत शिंदे गटाला मोठा हादरा, बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकांत लाकाळ असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या मुलाचे (आरोपीचे) नाव वैभव लाकाळ असे आहे. वैभवने त्याच्या वडिलांच्या डोक्यात खोऱ्याच्या दांड्याने वार केला. या प्राणघातक हल्ल्यानंतर चंद्रकांत लाकाळ यांचा मृत्यू झाला. भक्तीच्या वादातून मुलाने वडिलांची हत्या झाल्याचे म्हटले जात आहे.

Dharashiv Crime
Shivaji Park : शिवाजी पार्कमध्ये किळसवाणा प्रकार, व्हिडिओ व्हायरल होताच नेटकरी भडकले

चंद्रकांत लाकाळ यांच्यावर त्यांच्या मुलानेच हल्ला केला. यानंतर चंद्रकांत यांना लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु होते. ८ ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान चंद्रकांत यांची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

Dharashiv Crime
Ind vs Pak : पाकिस्तानला मोठा फटका, भारताशी पंगा घेतल्याने पाकड्यांचे १२४० कोटींचे नुकसान

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com