cbse ssc result
cbse ssc result saam tv

CBSE Board Result 2023: CBSE चा 10 वी आणि 12 वीचा निकाल पुढच्या आठवण्यात जाहीर होण्याची शक्यता, असा पाहा Result

CBSE Student : सीबीएसई (CBSE) बोर्डाने 10वी आणि 12वीच्या निकालाची निश्चित तारीख अद्याप जाहीर केलेली नाही.

CBSE Class 10th-12th Result 2023: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई (CBSE) बोर्ड लवकरच 10वी आणि 12वी 2023 च्या परीक्षेचा निकाल जाहीर करेल. ऑनलाईन पद्धतीने हा निकाल जाहीर करण्यात येणार असल्यामुळे विद्यार्थी सीबीएसईच्या वेबसाईटला भेट देऊन हा निकाल पाहू शकतात.

निकाल डाउनलोड करण्यासाठी स्टेप्स अधिकृत वेबसाइट cbse.nic.in आणि cbse.gov.in वर दिल्या जातील. विद्यार्थी या वेबसाईटला भेट देऊन आपला निकाल (CBSE Class 10th Result) पाहून डाऊनलोड देखील करू शकतात. उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे. जेणेकरून कोणतीही महत्त्वाची माहिती सुटणार नाही.

cbse ssc result
Maharashtra Weather Update : मुक्काम वाढला! आठवडाभर विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा इशारा, मुंबईत पुढच्या 3 ते 4 तासांत बसरणार सरी

सीबीएसई (CBSE) बोर्डाने 10वी आणि 12वीच्या निकालाची निश्चित तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. पण पुढच्या आठवड्यात निकाल जाहीर होऊ शकतो, असा दावा केला जात आहे. महत्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांमधील अस्वास्थ्यकर स्पर्धा टाळण्यासाठी सीबीएसई टॉपर्सची यादी जाहीर करणार नाही. त्यामुळेच बोर्डाकडून उमेदवारांचे फक्त गुणच जारी केले जाणार आहेत.

सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी विविध प्लॅटफॉर्म म्हणजेच वेबसाइट, मोबाईल अॅप्स आणि एसएमएसद्वारे त्यांचा निकाल पाहू शकतात. याशिवाय विद्यार्थ्यांना थर्ड पार्टी वेबसाइटवरही निकाल पाहता येणार आहे. निकाल तपासण्याचे स्टेप्स अधिकृत वेबसाइटवर दिले जाणार आहेत.

cbse ssc result
Rohit Sharma On Loss: दारुण पराभवानंतर हिटमॅन भडकला! 'या' खेळाडूला कारणीभूत ठरवत सांगितलं पराभवाचं कारण

या ठिकाणी निकाल डाउनलोड करता येतील -

-results.cbse.nic.in

-cbseresults.nic.in

-digilocker.gov.in

-DigiLocker app

-UMANG app

यावेळी सीबीएसई बोर्डाच्या 10वी-12वीच्या परीक्षेत 38 लाख विद्यार्थी बसले होते. परीक्षेदरम्यान एकाही केंद्रातून फसवणूक झाल्याचे किंवा पेपर फुटल्याचे वृत्त आले नाही. परीक्षेदरम्यान मंडळाकडून कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.

cbse ssc result
Amaravati News : अरेच्चा! मेळघाटात भुताचे झाड; रात्रीत अचानक चमकलं, रहस्य नेमकं काय?

अशा प्रकारे तुम्ही 10वी-12वीचा निकाल पाहू शकता -

- सर्वात आधी अधिकृत वेबसाइटवर जा.

- त्यानंतर निकालाच्या लिंकवर क्लिक करा.

- रोल नंबर आणि इतर तपशील प्रविष्ट करा.

- त्यानंतर तुमचा 10वी किंवा 12वीचा निकाल समोर असेल.

- निकालाची प्रत डाउनलोड करा आणि ती तुमच्याकडे ठेवा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com