Amit Shah : महिलांची चिंता फक्त महिलाच करणार का?; अमित शहा लोकसभेत का संतापले? VIDEO

Amit Shah Vs Adhir Ranjan Choudhury : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.
Amit Shah Vs Adhir Ranjan Choudhury
Amit Shah Vs Adhir Ranjan ChoudhurySAAM TV
Published On

Amit Shah on Womens Reservation Bill :

संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयकावर लोकसभेच्या सभागृहात चर्चेवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.

महिला आरक्षण विधेयकावर लोकसभेत आज, बुधवारी चर्चा सुरू आहे. विरोधी पक्षाच्या वतीनं सोनिया गांधी यांनी चर्चेला सुरुवात केली. या विधेयकाला काँग्रेसचा पाठिंबा आहे, असं सोनियांनी जाहीर केलं.

सोनियांच्या भाषणानंतर भाजपचे खासदार निशिकांत दुबे हे सरकारच्या वतीनं सभागृहात बोलण्यासाठी उभे राहिले. दुबेंनी भाषणाला सुरुवात केली. त्याचवेळी विरोधी बाकावरून आक्षेप घेण्यात आला. सभागृहात खुली चर्चा असताना, भाजपकडून महिला आरक्षण विधेयकावर बोलण्यासाठी महिला खासदारांना संधी न देता दुबेंना का बोलण्यास सांगितले, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विरोधकांचा गोंधळ आणि दुंबेंचे भाषण सुरू असतानाच अमित शहांनी अधीर रंजन चौधरींना सवाल केला. मी त्यांना विचारू इच्छितो की, केवळ महिलाच इतर महिलांची चिंता करणार का? पुरूष करू शकत नाहीत का? आपल्या देशातील संस्कृती आहे. भाऊ एक पाऊल पुढे येऊन महिलांच्या हिताचा विचार करतो, असं ते म्हणाले.

Amit Shah Vs Adhir Ranjan Choudhury
Womens Reservation Bill : महिला आरक्षण विधेयकाला माझा पाठिंबा, तात्काळ लागू करा : सोनिया गांधी

काँग्रेसच्या वतीने अधीर रंजन चौधरींना आधी बोलू दिलं नाही त्यामुळे त्यांचा जळफळाट झाला आहे, असा टोलाही शहा यांनी लगावला.

निशिकांत दुबेंनीही साधला निशाणा

भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनीही या विधेयकावरून काँग्रेसवर निशाणा साधला. मोदी सरकारने विधेयक आणले म्हणून काँग्रेसच्या पोटात दुखतंय, असं ते म्हणाले. तत्पूर्वी सोनिया गांधी यांनी या विधेयकाला समर्थन देतानाच, काही त्रुटींवर बोट ठेवले होते. विधेयक अंमलात आणण्यास होत असलेल्या विलंबावरून सोनियांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. सर्व अडथळे दूर करून हे विधेयक तात्काळ अंमलात आणावे, असे त्या म्हणाल्या होत्या.

Amit Shah Vs Adhir Ranjan Choudhury
Women Reservation Bill 2023 : तुम्ही लॉलीपॉपसारखं विधेयक फिरवत बसलात; भाजप खासदाराचा काँग्रेसवर पलटवार

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com