वॉशिंग्टन: अफगाणिस्तानमध्ये आता तालिबानी सत्ता येणार हे स्पष्ट झाल्यानंतर सोमवारी देश सोडण्यासाठी काबूल विमानतळावर Kabul Airport सुटकेसाठी मोठी गर्दी झाली होती. अफगाणिस्तानच्या नागरिकांमध्ये प्रचंड भितीचं (Fear of Taliban) वातावरण आहे. काहीही करुन लोकांना तिथून बाहेर पडायचं आहे. त्यासाठी लोकं वाटेल ते करत आहेत. विमानात जागा मिळत नसल्याने काही अफगाण नागरिकांनी C-17 ग्लोबमास्टर विमानाच्या चाकाला (Wheel) लटकून प्रवास करण्याचा प्रयत्न केला. व्हायरल झालेल्या व्हिडिओत दिसून आले होते की, अफगाणिस्तानातून पळून जाण्याच्या प्रयत्नात दोघांचा दुर्देवी मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे हे दोघेजण C-17 विमानाच्या चाकांना लटकलेली होते. विमामाने टेक ऑफ केल्यानंतर काही वेळातच हे दोघेजण मोठ्या उंचीवरुन खाली पडले आणि त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला होता.
सोमवारी काबूल विमानतळावर घडलेल्या या घटनेचा आढावा अमेरिकेचे विशेष तपास कार्यालय घेत आहे, असे अमेरिकन एअर फोर्सकडून सांगण्यात आले आहे. काही जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. माहितीनुसार, सोमवारी अमेरिकन एअर फोर्सचे C-17 ग्लोबमास्टर विमान उड्डाणाच्या तयारीत होते आणि अफगाणि नागरिक या विमानासोबत धावत होते.तर काही नागरिक चाकाजवळच्या भागामध्ये बसलेले असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
अमेरिकन एअर फोर्स कडून या घटनेत नेमका किती जणांचा मृत्यू झाला हे सांगितलेले नाही. पण लँडिंग केल्यानंतर कतारच्या उदीद एअर बेसवर C-17 ग्लोबमास्टरने विमानाच्या चाकाजवळ काही मृतदेह आढळल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेचे व्हिडीओ मोठया प्रमाणात सोशल मीडियावर अफगाणिस्तानातील भयानक परिस्थितीची कल्पना पाहण्यात येत आहेत.
Edited By-Sanika Gade
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.