Mayawati's Big Announcement: मायावतींनी कोणाला केला आपला उत्तराधिकारी? कोण आहेत ते?

Uttar Pradesh News : मायावतींनी कोणाला केला आपला उत्तराधिकारी? कोण आहेत ते?
Mayawati Latest News
Mayawati Latest NewsSAAM TV
Published On

Mayawati Latest News :

उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी त्यांचा पुतण्या आकाश आनंद यांना उत्तराधिकारी म्हणून घोषित केले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मायावतींनी मोठी घोषणा केली आहे. पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये आकाश आनंद यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली होती.

आकाश आनंद यांनी राजस्थानपासून मध्य प्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगडपर्यंत पक्षाला मजबूत करण्याचा प्रयत्न केला. आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी मायावतींनी आकाश आनंदला राष्ट्रीय मोठा चेहरा बनवण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी बसपाचे प्रदेश पदाधिकारी आणि जिल्हा नेत्यांची विशेष बैठक बोलावण्यात आली होती. सभेत मायावतींनी ही मोठी घोषणा केली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mayawati Latest News
Allahabad HC News: पत्नीचे वय 18 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर वैवाहिक बलात्कार गुन्हा मानता येणार नाही : हायकोर्ट

मायावतींच्या नेतृत्वाखाली बसपा लोकसभा निवडणूक लढवेल, असे मानले जात होते. बसपा देशाच्या सार्वत्रिक निवडणुका एकट्याने लढवणार असल्याचे मायावतींनी आधीच जाहीर केले होते. रविवारी पक्षाच्या राज्य पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर मायावती यांनी पत्रकार परिषदेत आकाशला आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले. (Latest Marathi News)

कोण आहे आकाश आनंद?

आकाश आनंद हे मायावतींचे भाऊ आनंद कुमार यांचे पुत्र आहे. आकाश यांनी लंडनमधून मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनचे (MBA) शिक्षण घेतले आहे. मायावतींनी त्यांना 2017 मध्ये राजकारणात आणले. नेहमी परिवारवादाच्या विरोधात बोलणाऱ्या मायावतींनी कधीही आपला भाऊ आनंद कुमार यांना प्राधान्य दिले नाही.

Mayawati Latest News
Gopichand Padalkar: '...तर त्यांच्या अंगावर कपडेही शिल्लक राहिले नसते', चप्पलफेक प्रकणावरून पडळकरांनी दिली संतप्त प्रतिक्रिया

पण आपला राजकीय वारसा जपला जावा म्हणून त्यांनी आपला पुतण्या आकाश आनंद यांना पुढे केले. 2017 मध्ये झालेल्या सहारनपूरच्या सभेत मायावतींनी आकाश आनंद यांना आपल्यासोबत मंचावर आणले होते. त्याचवेळी आकाश आनंद यांची राजकारणात एंट्री झाली. तेव्हापासून त्यांच्याकडे मायावतींचे उत्तराधिकारी म्हणून पाहिले जाऊ लागले होते. अखेर रविवारी त्यांनी यासंदर्भात मोठी घोषणा केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com