मोठा कट उधळला! PM मोदींच्या दौऱ्याच्या एक दिवस आधीच पंजाबमध्ये शस्त्रसाठा जप्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याआधीच सीमा सुरक्षा दलानं पंजाबमध्ये भारत-पाकिस्तान सीमेवर मोठा शस्त्रसाठा पकडला.
BSF Jawan Recovered Arms in Punjab/ANI
BSF Jawan Recovered Arms in Punjab/ANISAAM TV

चंदीगड: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्याच्या एक दिवस आधीच म्हणजेच आज मंगळवारी सीमा सुरक्षा दलानं (BSF) भारत-पाकिस्तान सीमेवर मोठा शस्त्रसाठा पकडला. हा शस्त्रसाठा पाकिस्तानातून या ठिकाणी आणला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. राजा मोतम आणि बीओपी जोगिंदर दरम्यान हा साठा हस्तगत करण्यात आला आहे.

BSF Jawan Recovered Arms in Punjab/ANI
Video : रशिया पुन्हा आक्रमक, युद्धावरून अमेरिकेचा भारतावर दबाव

भारत-पाकिस्तान सीमेवर पंजाबमध्ये (Punjab) गस्त घालत असतानाच सीमा सुरक्षा दलाने सीमेपलीकडून तस्करी केलेल्या शस्त्रांचा मोठा साठा हस्तगत केला आहे. फिरोजपूर सेक्टरमधून सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवानांनी सहा मॅगजिनसह तीन एके ४७ रायफल, चार मॅगजिन असलेली २ एम ३ सबमशीन गन आणि दोन मॅगजिनसह २ पिस्तुल जप्त केले. या शस्त्रांची पाकिस्तानातून तस्करी केल्याचा संशय बीएसएफला आहे.

BSF Jawan Recovered Arms in Punjab/ANI
Mumbai News : मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्याची धमकी; विरारमधून एका संशयिताला अटक

पाकिस्तानातून तस्करी केल्याचा संशय

बीएसएफच्या जवानांनी पंजाबमध्ये भारत-पाकिस्तान (India-Pakistan) सीमेजवळ गस्त घालत असताना शस्त्रांचा हा मोठा साठा जप्त केला आहे. ही शस्त्रास्त्रे सीमेपलीकडून तस्करी केल्याचा संशय आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हा शस्त्रसाठा पाकिस्तानातून आणला असल्याचा संशय आहे.

दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पंजाब दौरा होणार असून, राज्यात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. पंजाब पोलिसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मोहाली दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. पंतप्रधान मोदी हे मोहालीत मुल्लांपूर येथे २४ ऑगस्ट रोजी होमी भाभा कॅन्सर हॉस्पिटल आणि अनुसंधान केंद्राचे उद्घाटन करतील.

मोहाली पोलिसांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी २४ ऑगस्ट रोजी मोहालीत येणार असून, सुरक्षा व्यवस्था तैनात आहे. विशेष मोहीम राबवण्यात येत असून, वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. जिल्ह्यातील अन्य ठिकाणांवर तपासणी केली जात आहे. जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्या वाहनांची झडती घेतली जात आहे. मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी ठिकठिकाणी बंदोबस्तावर आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com