
Wedding Video : लग्न म्हणजे प्रत्येकाची वेगळी हौस असते. प्रत्येक व्यक्ती या दिवसासाठी काही स्वप्न पाहत असतो. ते सर्व सत्यात उतरवण्यासाठी घ्यावी लागणारी मेहनतही खूप असते. अशात परीक्षा आणि लग्न या दोन गोष्टी एकत्र आल्या तर. काही घरांमध्ये लहान भावाची किंवा बहिणीची परीक्षा असल्याने अनेक वेळा मोठ्या बहिणीचं लग्न पुढे ढकलण्यात येतं. अशात सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक वधू चक्क नटूनथटून परीक्षेला पोहचली आहे. (Viral Wedding Video)
सोशल मीडियावर व्हायरल होतं असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक मुलगी नवरी सारखी नटली आहे. व्हिडिओमध्ये तिने सुंदर शालू परिधान केला आहे. तसेच अंगावर सुंदर दागिने परिधान केले आहेत. केसात मोठा गजरा मळला आहे. या संपूर्ण लूकमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. नवी नवरी तशी कुठे फिरत नाही. मात्र आतापर्यंत निवडणुकीच्या काळात काही जोडप्यांनी लग्नाआधी किंवा लग्न झाल्यावर लगेच मतदान केंद्र गाठल्याच्या अनेक व्हिडिओ व्हायरल झाल्या आहेत.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये पुढे दिसत आहे की, नवरी कारमधून प्रवास करत आहे. प्रवास करताना ती थोडा अभ्यासही करत आहे. हा अभ्यास झाल्यावर ती परीक्षा केंद्राजवळ पोहचते त्यावेळी एक मैत्रीण येऊन तिला मेडिकलचे सफेद जॅकेट देते आणि गळ्यात स्टेथोस्कोप घालते. त्यानंतर नवरी प्रॅक्टिकल परीक्षेला जाते. बाहेर आल्यावर ती आईला घट्ट मिठी मारतो. तिला प्रॅक्टिकल परीक्षा खूप सोपी गेली असावी असं तिचं आनंद पाहून वाटतं आहे.
आता या नवरीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. जेव्हा ती परीक्षाकेंद्रावर जाते तेव्हा तिला पाहून सगळेच चकित होतात. ही मुलगी परीक्षा असूनही लग्नाला कशी काय आली असा प्रश्न अनेकांना पडला आहे. लग्न असूनही तिने शिक्षणाला दिलेलं महत्त्व पाहून सगळीकडे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.