Viral Video : बापरे! हेल्मेटमध्ये चक्क साप...; थरारक व्हिडिओ आला समोर

सापाला पाहून तो वक्ती भयभीत होतो आणि नंतर एका सर्पमित्राला बोलावतो.
Viral Video
Viral Video Saam TV

Viral Video : सोशल मीडियावर नेहमीच अनेक अतरंगी व्हायरल व्हिडिओ पहायला मिळतात. यात सापांचे देखील काही व्हिडिओ असतात. साप नावं ऐकलं तरी अनेकांना पळता भुई थोडी होते. अशात गरमीच्या दिवसांमध्ये मानवी वस्तीत साप बाहेर पडल्याचे दिसते. (Latest Viral Video)

सध्या सोशल मीडियावर असाच एक सापाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये चक्क एका व्यक्तीच्या हेल्मेटमधून साप बाहेर निघाला आहे.साप असलेलं हेल्मेट त्या व्यक्तीने घातलं असतं तर काय झालं असतं याचा विचारही करवत नाही. सध्या या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

Viral Video
Viral Video: अबब! थैली खाली ठेवताच बाहेर निघाले सापचं साप; पुढं जे झालं ते.... काळजाचा थरकाप उडवणारा Video Viral

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती बाहेर जाण्यासाठी तयार होतो. वाहन चालवण्यासाठी तो हेल्मेट घेतो आणि सुदैवाने त्याला हेल्मेट डोक्यात घालताना काही हलचाली जाणवतात. त्याला संशय आल्याने तो बॅट्रीच्या सहाय्याने तपासतो तेव्हा त्याला समजते की, आतमध्ये एक लहान साप आहे.

Viral Video
Viral Video : Valentine आधीच प्रेमी युगुलाचा खुल्लम खुल्ला प्यार व्हायरल; धावत्या बाईकवर जोडप्याचा रोमान्स

सापाला पाहून तो वक्ती भयभीत होतो आणि नंतर एका सर्पमित्राला बोलावतो. सर्पमित्र हेल्मेटमधून साप व्यवस्थीत बाहेर बाहेर काढतो आणि निसर्ग अधिवासात सोडून देतो. या घटनेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. नेटकरी यावर वेगवेगळ्या कमेंट करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com