चंदीगड : भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) नोटा घेऊन जात असलेले तीन ट्रक एकमेकांवर आदळून भीषण अपघात झाला आहे. एकूण पाच ट्रकचा ताफा होता. एकामागे एक जात असलेल्या दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या क्रमांकाच्या ट्रकला हा अपघात झाला आहे. चंदीगड मधील सेक्टर-26 चौकाजवळ हा अपघात झाला.
या अपघाताची भीषणता इतकी होती की तिसऱ्या आणि चौथ्या ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातातील चौथ्या क्रमांकाच्या ट्रकमधील महिला कॉन्स्टेबलला अपघातानंतर लोकांनी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रयत्न अयशस्वी ठरला. नंतर क्रेन आणि कटरच्या मदतीने पोलिसांनी सुमारे एक तासानंतर या महिला कॉन्स्टेबलला बाहेर काढण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर आहे. या अपघातात एक पुरुष हवालदारही जखमी झाला आहे.
हे देखील पहा :
पोलिसांनी ट्रक चालक तेजिंदर सिंग आणि गुरबेज सिंग यांच्यावर निष्काळजीपणा केल्याबद्दल आणि वाहनांमध्ये योग्य अंतर न ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. काल सोमवारी आरबीआयचे पाच ट्रक रेल्वे स्थानकातून सेक्टर-17 मधील आरबीआय कार्यालयाकडे जात होते. ट्रकमधील पैशांमुळे पोलिसांचा ताफा देखील या ट्रकसोबत होता. दुपारी 2 वाजेच्या सुमारास, वाहतूक सेक्टर -26 चौकातून पुढे जाताच, सेक्टर -26 चौकाच्या आधीच्या वाहतुकीमुळे, पुढे जाणाऱ्या पोलिसांच्या भरधाव वाहनाने ब्रेक लावले. अ
शा स्थितीत मागून येत असलेले पहिले आणि दुसरे ट्रकही अचानक थांबले. यामध्ये तिसऱ्या ट्रकच्या ड्रायव्हरनेही अचानक ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, ब्रेक न लागल्याने हा ट्रक जोरात जाऊन दुसऱ्या क्रमांकाच्या ट्रकला जाऊन धडकला. पाठोपाठ चौथ्या ट्रकच्या ड्रायव्हरने बचावासाठी ट्रकला उजव्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न केला, मात्र, वेग जास्त असल्याने तो देखील हा अपघात टाळू शकला नाही.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.