काबुल हादरलं! बॉम्बस्फोटात रशियन दुतावासाच्या दोन अधिकाऱ्यांसह २० जणांचा मृत्यू

अफगानिस्थानची राजधानी काबुलमध्ये खळबळ माजवणारी घटना घडली आहे.
Saam breking
Saam brekingSaam Tv
Published On

काबुल : अफगानिस्थानची राजधानी काबुलमध्ये (Kabul) खळबळ माजवणारी घटना घडली आहे. आज सोमवारी रशियन दुतावासाच्या बाहेर मोठा बॉम्बस्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ज्यावेळी हा बॉम्बस्फोट (Bomb blast) झाल त्यावेळी नागरिक विसा काढण्यासाठी रांगेत उभे होते. या दुर्देवी घटनेत दुतावास मध्ये असलेल्या दोन अधिकाऱ्यांसह वीस जणांनचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. (Twenty People Died in kabul Bomb blast)

Saam breking
BMC Election: मुंबई महापालिकेची निवडणूक शेवटचीच समजून लढा; फडणवीसांचा कार्यकर्त्यांना सल्ला

रशियन सरकारी संस्था आरआईए नवोस्तीने दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी खूप नागरिक विसा काढण्यासाठी रांगेत उभे होते. एक रशियन अधिकारी नागरिकांशी संवाद साधण्यासाठी बाहेर आला, त्याचवेळी मोठा स्फोट झाला. हा बॉम्बस्फोट करणारा दहशतवादी होता. हल्ला केल्यानंतर तो पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, त्याचवेळी सुरक्षारक्षकांनी त्याला जागीच ठार केले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Saam breking
Amit Shah : एकनाथ शिंदे गट हीच खरी शिवसेना; अमित शाह काय म्हणाले? वाचा...

दरम्यान, या हल्ल्याबाबत कोणत्याही संघटनेनं पुष्टी केली नाहीय. तालिबान सत्तेत आल्यानंतर अफगानिस्थानमध्ये झालेला हा पहिला हल्ला होता. मागील वर्षी अमेरिका आणि नाटोच्या सैनिकांनी अफगानिस्थान सोडण्याच्या आधी इस्लामिक स्टेट ग्रुपशी जोडलेल्या हल्लेखोरांनी तालिबानवर हल्ले करणं बंद केलं होतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com