BMC Election: मुंबई महापालिकेची निवडणूक शेवटचीच समजून लढा; फडणवीसांचा कार्यकर्त्यांना सल्ला

'25 वर्ष मुंबई महापालिकेत ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांना आता खाली खेचायची वेळ आली आहे.'
BJP And BMC
BJP And BMCSaam TV
Published On

सुशांत सावंत -

मुंबई: मुंबई महापालिका निवडणूक (BMC Election) आपल्यासाठी महत्त्वाची आहे, ही निवडणूक शेवटची आहे असे समजा आणि पुर्ण ताकदीने लढा असा सल्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आजच्या दिला असल्याचं समजतं आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आज मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबईत आल्यानंतर शाह यांनी 'लालबागचा राजाचं (Lalbaugcha Raja) दर्शन घेतलं. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे नेतेही हजर होते.

गणेश दर्शनानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर एक बैठक घेण्यात आली या बैठकीत अमित शाह यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. तर यावेळी फडणवीस यांनी देखील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मुंबई महापालिका जिकंण्यासाठी प्राणपणाला लावून लढण्याचा आदेश दिल्याचं समजतं आहे.

पाहा व्हिडीओ -

'मुंबई महापालिकेची निवडणूक आपल्यासाठी महत्त्वाची आहे, ही निवडणूक शेवटची आहे असेच समजा आणि पुर्ण ताकदीने लढाई लढा.' असा सल्ला फडणवीस कार्यत्यांना दिल्याचं समजतं आहे. त्यामुळे भाजप (BJP) मुंबई पालिकेसाठी सज्ज झाली असून कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबईवर भाजपचा झेंडा फडकवा असाच संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

त्यामुळे येऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना असा टोकाचा संघर्ष होणार यात काही शंका नाही. एकीकडे फडणवीसांनी पालिका जिंकण्याचा निर्धार केला आहे तर अमित शहा यांनी या बैठकीदरम्यान उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

शिवसेनेने युती तोडली -

BJP And BMC
Amit Shah : उद्धव ठाकरेंना जमीन दाखवण्याची वेळ आली; अमित शाहांचा घणाघात

'उद्धव ठाकरे यांनी आपल्याला धोका दिला, 2014 साली दोन जागांसाठी शिवसेनेनं युती तोडली, राजकारणात जो धोका देतो तो कधीच यशस्वी होत नाही. शिवसेना स्वत:च्या निर्णयामुळे छोटी झाली. आता एकनाथ शिंदे गट हीच खरी शिवसेना आहे. आणि ती आपल्या सोबत असल्याचं वक्तव्य शाह यांनी केलं आहे.

BJP And BMC
मुख्यमंत्री शिंदे गटास बाप्पा पावणार ! सेना नेत्याची पक्षास साेडचिठ्ठी ?

भ्रष्टाचाऱ्यांना खाली खेचायची वेळ -

अमित शाह आणि फडणवीस यांच्यासह मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी देखील सेनेवर टीका केली, '25 वर्ष मुंबई महापालिकेत ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांना आता खाली खेचायची वेळ आली आहे. आता रस्त्यावर उतरू आणि पालिकेत सत्ता मिळवू, आपल्याला आता मुंबईकरासाठी सत्ता मिळवायला हवी असं वक्तव्य शेलार यांनी केलं.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com