Bollywood Singer
Bollywood SingerSaam Tv News

बॉलिवूड सिंगरवर हल्ला करणाऱ्या ५ शार्प शूटरचा एन्काऊंटर, ४ जणांच्या पायात लागली गोळी, नेमकं प्रकरण काय?

Bollywood Singer: गुरुग्राममध्ये झालेल्या चकमकीनंतर पाच आरोपींना अटक. राहुल फाजिलपुरियावर झालेल्या गोळीबार आणि रोहित शौकीन खून प्रकरणाशी आरोपी संबंधित. आरोपी रोहित सरधानिया आणि दीपक नांदल गॅंगचे शुटर असल्याचं उघड.
Published on
Summary
  • गुरुग्राममध्ये झालेल्या चकमकीनंतर पाच आरोपींना अटक.

  • राहुल फाजिलपुरियावर झालेल्या गोळीबार आणि रोहित शौकीन खून प्रकरणाशी आरोपी संबंधित.

  • आरोपी रोहित सरधानिया आणि दीपक नांदल गॅंगचे शुटर असल्याचं उघड.

  • पोलिसांच्या कारवाईनंतर आरोपींना खासगी रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू.

बॉलिवूड गायक राहुल फाजिलपुरियावर गोळीबार आणि त्यांचे फायनान्सर रोहित शौकीनच्या हत्येप्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी तपासाची फिरवत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. ५ शार्प शुटर आरोपींना अटक केली आहे. गुरूग्राम पतौडी रोडवरील वजीरपूर भागात बुधवारी झालेल्या चकमकीनंतर त्यांना पकडण्यात आलं आहे. या प्रकरणात आता पुढील तपास सुरू आहे.

वजीरपूर भागात इनोव्हा गाडीतून आरोपी जात होते. वाहनात आरोपी असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी गाडीचा पाठलाग केला. तसेच गाडी अडवली. गाडी अडवल्यानंतर आरोपींनी पोलिसांवर गोळीबार केला. नंतर पोलिसांनीही गोळीबार केला. या चकमकीत चार गुन्हेगारांच्या पायाला गोळी लागली.

एसटीएफनं सांगितलं की, झज्जर येथील विनोद पहेलवान, सोनीपत येथील पदम उर्फ राजा, शुभम उर्फ काला, गौतम उर्फ गोगी आणि आशिष उर्फ आशु अशी आरोपींची ओळख पटली आहे. त्यांच्या पायांना गोळीबार केल्यानंतर आरोपींना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

अटक केलेले सर्व गुन्हेगार हे परदेशी गुंड रोहित सरधानिया आणि दीपक नांदल यांचे शुटर असल्याची माहिती आहे. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com