Congress Vs BJP: भाजप- काँग्रेसमध्ये शाब्दिक युद्ध; काँग्रेसच्या आरोपांवर रविशंकर प्रसाद यांचे प्रत्युत्तर

Ravishankar Prasad : आमची बँक खाती गोठवण्यात आल्याचा आरोप करत काँग्रेसने भाजपवर हल्लाबोल केला होता. त्यांच्याकडे पोस्टर छापण्यासाठी आणि रेल्वे तिकिटासाठी सुद्धा पैसे नसल्याचं काँग्रेसने म्हटलं होतं.
Ravishankar Prasad
Ravishankar PrasadANI

Ravishankar Prasad Press Conference :

लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर राजकीय पक्षांच्या एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केला जात आहे. काँग्रेस आणि भाजपमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. बँक खाते गोठवण्यात आले आहे. त्यांच्याकडे पोस्टर छापण्यासाठी सुद्धा पैसे नसल्याचा आरोप काँग्रेसने केला होता.काँग्रेसच्या या आरोपांना भाजपने उत्तर दिलंय.रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेसला उत्तर दिले आहे. या परिषदेत संबित पात्रा देखील उपस्थित होते. (Latest News)

आमची बँक खाती गोठवण्यात आल्याचा आरोप करत काँग्रेसने भाजपवर हल्लाबोल केला होता. त्यांच्याकडे पोस्टर छापण्यासाठी आणि रेल्वे तिकिटासाठी सुद्धा पैसे नसल्याचं काँग्रेसने म्हटलं होतं.काँग्रेसच्या या आरोपाला भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी प्रत्युत्तर दिलंय. काँग्रेसचा पुढील निवडणुकीत पराभव होणार असल्याने अशाप्रकारे विधाने केली जात असल्याचं रविशंकर प्रसाद म्हणालेत.

रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केलाय. राहुल गांधी यांनी दिलेलं ज्ञान समजून घेण्यात वेळ लागल्याचं रविशंकर प्रसाद म्हणाले. आगामी निवडणुकीत काँग्रेसचा पराभव होणार असल्याचं दिसत आहे, हा अर्थ काँग्रेसच्या पत्रकार परिषदेतून निघत असल्याचं रविशंकर प्रसाद म्हणालेत. राहुल गांधी यांनी लोकशाहीची लाज राखावी, राहुल गांधी खोटं बोलू शकतात, शिवीगाळ देऊ शकतात. लोकं सर्व ऐकत आहेत. देशातील लोकं राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना मते देत नाहीत तर आम्ही भाजपने काय करावे.

कमी ज्ञानामुळे समस्या निर्माण होतात.आयकराचे कलम १३ अनुसार राजकीय पक्षांना आयकर भरावा लागत नाही. पण यासोबतच राजकीय पक्षाला त्याचे रिटर्न भरावे लागेल, तरच तुम्ही करातून सूट मिळू शकते. राहुल गांधी यांनी आज धडधडीत खोटे बोलले आहेत. राहुल गांधी, सोनिया गांधी, तुमचा पराभव निश्चित आहे. त्यांनी भारताच्या लोकशाहीची जगासमोर लाज काढली,असं रविशंकर प्रसाद म्हणालेत.या परिषदेत उपस्थित असलेले संबित पात्रा यांनीही काँग्रेसवर हल्लाबोल केला.

जर भारताच्या नियमांनुसार तुम्ही डिफॉल्टर आहात तर तुम्ही ते मानले पाहिजे. काँग्रेस पार्टी संपणार आहे. यावेळी पात्रा यांनी पीएम शब्दाचा अर्थ सांगितला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पी म्हणजे पसीना, म म्हणजे मेहनतीने पीएम बनलेत. जो मेहनत घेईल तोच विजयी होईल असं संबित पात्रा म्हणालेत.

Ravishankar Prasad
Lok Sabha Election : 'विकसित भारत' मेसेजवर निवडणूक आयोग नाराज; केंद्र सरकारला बजावली नोटीस

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com