भाजप कार्यालय फोडलं; 15-20 हल्लेखोरांकडून नेत्यांवर हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

bjp office attacked in punjab : पंजाबमध्ये भाजप कार्यालय फोडल्याची घटना घडली आहे. 15-20 हल्लेखोरांकडून नेत्यांवर हल्ला केल्याचे सीसीटीव्हीतून समोर आलं आहे.
bjp office attack
bjp office attacked in punjab Saam tv
Published On
Summary

पंजाबमध्ये निवडणुकीआधी राजकीय वातावरण तापलंय

पंजाबमध्ये अज्ञातांनी भाजप कार्यालय फोडलं

१५-२० हल्लेखोरांनी हल्ला केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ

पंजाबमध्ये निवडणुकीआधीच राजकीय वातावरण तापलं आहे. पंजाबच्या तरनतारन बायपासजवळील भाजपचे जिल्हा मुख्यालयावर काही अज्ञातांनी हल्ला केला. त्यांनी कार्यालयातील नेत्यांवरही हल्ला केला. तसेच कार्यालायातील काचा देखील फोडल्या आहेत. १५ ते २० हल्लेखोरांनी मिळून हल्ला केल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे.

भाजपचं कार्यालय फोडल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. हल्लेखोरांनी हल्ला केल्याने कार्यालयात असलेले नेते आणि कार्यकर्त्यांची एकच धावाधाव झाली.

bjp office attack
ऐन निवडणुकीत भाजप उमेदवारावर हल्ला; ताफ्यातील गाड्या फोडल्या, राजकीय वर्तुळात खळबळ

भाजप नेत्यांच्या आरोपानुसार, हल्लेखोरांनी कार्यालयात घुसून खुर्च्या आणि इतर साहित्याचं नुकसान केलं. 'पंजाब एकता जिंदाबाद' आणि 'भाजप मुर्दाबाद'च्या घोषणाबाजी करत पोस्टर फाडले. मीडिया रिपोर्टनुसार, भाजप नेत्यांनी एका हल्लेखोराला पकडलं. परंतु त्याचे साथीदार येऊन घेऊन गेले. या घटनेनंतर भाजप नेत्यांनी एकच संताप व्यक्त केला आहे. भाजप नेत्यांनी तातडीने पोलिसांकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे.

भाजप कार्यालय फोडल्याची माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं. हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. हल्ला झाल्यानंतर कार्यालयाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. हल्लेखोरांचा नेमका हल्ला करण्यामागे उद्देश काय होता, याचा तपास करण्याचे काम पोलिसांनी सुरू केलं आहे. हल्लेखोरांचा ओळख पटवून त्यांचा शोध घेतला जाईल, असा विश्वास पोलिसांनी भाजप नेत्यांना दिला. पोलिसांना आजूबाजूच्या दुकानदार आणि स्थानिकांची चौकशी सुरू केली आहे.

bjp office attack
पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उफाळला; भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांच्या जवळच्या व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या, घटनाक्रम आला समोर

सीसीटीव्हीमध्ये काय दिसत आहे?

अज्ञात हल्लेखोरांनी भाजप कार्यालायत प्रवेश केला. हल्लेखोरांनी हातात असलेली पत्रके उधळली. त्यानंतर भाजपविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी भाजप नेत्यांनी हल्लेखोरांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हल्लेखोरांनी दगडफेक केली. यावेळी दोन्ही गटात खुर्च्यांची फेकाफेक झाली. यावेळी एका कार्यकर्त्याला पकडण्याचाही भाजप पदाधिकाऱ्यांनी केला. अज्ञातांनी हल्ला केल्यानंतर एका नेत्यांने तातडीने पोलिसांना माहिती कळवली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com