पश्चिम बंगाल... स्वातंत्र्यानंतर आजवर भाजपच्या हाती कधीच सत्तेची सुत्रं न आलेलं राज्यं... मात्र यंदा भाजपनं बंगाल जिंकलंच... पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जींची 15 वर्षांची सत्ता उलथवून टाकत भाजपनं बंगालमध्ये धमाकेदार एण्ट्री केलीय...
खरं तर एकेकाळी पश्चिम बंगाल जिंकणं भाजपसाठी अशक्य मानलं जायचं... 2011 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला एकही जागा मिळाली नव्हती... त्यानंतर 2016 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 3 जागा मिळाल्या.. पुढे 2021 मध्ये भाजपनं आणखी जोर लावला आणि भाजपचं संख्याबळ 77 पर्यंत पोहोचलं... आता हेच संख्याबळ दोनशे पार गेलंय... अशक्य मानल्या जाणाऱ्या बंगालवर भाजपनं आपला झेंडा फडकवलाय... त्यासाठी भाजपनं तब्बल 15 वर्षांपासून काटेकोर रणनिती आखली... आणि शिखर गाठलं ते यंदाच्या निवडणुकीत....
भाजपनं भुपेंद्र यादव, सुनील बन्सल आणि बिप्लब कुमार देव यांच्याकडे बंगालच्या निवडणुकीची सुत्रं दिली... या नेत्यांनी बंगालच्या निवडणुकीचं मायक्रो मॅनेजमेंट केलं.. बंगालमध्ये कमल मेला आयोजित करुन घराघरापर्यंत संपर्क वाढवला.. बंगालमध्ये फुटबॉल केवळ खेळ नाही तर फुटबॉलसोबत जनभावना जोडलेली आहे.. त्यामुळे फुटबॉल स्पर्धा आयोजित करुन युवकांना पक्षाशी जोडलं... बूथ प्रमुख, पन्ना प्रमुखांच्या माध्यमातून भाजप घराघरापर्यंत पोहोचलं... त्यानंतर भाजपनं सोशल मीडियाच्या माध्यमातून बंगालमधील युवकांना साद घातली.. 1 लाख 65 हजार घरांमध्ये छोट्या बैठकांचं आयोजन केलं.. सोशल मीडियाच्या माध्यमातून युवकांना जोडलं... रोजगार, उद्योग, शासकीय कर्मचाऱ्यांचा 7 व्या वेतन आयोगाचा मुद्दा प्रचारात वापरला... 12 हजार चौकसभा घेत वातावरण तापवलं... मोदी-शाहांसह भाजपच्या 150 पेक्षा जास्त नेत्यांनी बंगालमध्ये विधानसभानिहाय सभा घेतल्या... 80 पेक्षा जास्त प्रेस कॉन्फरन्स केल्या... आरजी कर मेडिकल कॉलेजमधील डॉक्टरवरचा अत्याचाराचा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी आणला... आणि भाजपनं बंगाल जिंकलं...
भाजपनं महिला मतदार, स्थलांतरीत मजूर, मतुआ समाजाच्या सीएएचा मुद्दा, राजबंशी, कुर्मी, जंगलमहाल समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा पुढे करत सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून हिंदूत्वाचं कार्ड खेळलं... ममता बॅनर्जी यांच्या काळात वाढलेल्या हिंसाचाराची भीती दाखवत आणि मोदींच्या लोकप्रियतेचा फायदा घेत बंगालमध्ये प्रचार केला... त्यामुळेच ममता बॅनर्जींनी बंगाली अस्मितेचा नारा दिलेला असतानाही भाजपला बंगाल जिंकणं शक्य झालं... आता बंगाल भाजपच्या हाती आलं असलं तरी आगामी काळात बंगाली जनतेच्या अपेक्षा पूर्ण कऱण्यात भाजपला यश मिळणार का? याकडे देशाचं लक्ष लागलंय...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.