सावधान! मानवापर्यंत पोहोचला 'बर्ड फ्लू'; अमेरिकेत आढळला दुसरा रुग्ण

Bird Flu Infection : एकीकडे संपूर्ण जग कोरोनासोबत लढा देत असताना, पक्षांमध्ये होणाऱ्या 'बर्ड फ्लू'चा प्रसार आता माणसांना देखील होऊ लागला आहे.
Bird Flu Infection
Bird Flu InfectionSaam Tv
Published On

वॉशिंग्टन: एकीकडे जगात कोरोना महामारीने धूमाकुळ घातला असतानाच, आता अमेरिकेतून (America) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अमेरिकेतील एका व्यक्तीला चक्क'बर्ड फ्लू'ची (Bird Flu) लागण झाली आहे. अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि सुरक्षा केंद्राने (US Centers for Disease Control and Prevention) याबाबतची माहिती दिली आहे. आपल्या अहवालात त्यांनी म्हटलं आहे की, कोलोराडो येथे राहणाऱ्या एका व्यक्तीमध्ये 'बर्ड फ्लू'च्या H5 या विषाणूची लक्षणे दिसून आली आहे. ही व्यक्ती संक्रमित कोंबडीच्या संपर्कात होती.

Bird Flu Infection
चिंता आणखी वाढली! देशात कोरोना रुग्णसंख्येत भर, 'अशी' आहे सद्यस्थिती

चीनमध्ये आढळला होता पहिला रुग्ण

दोन वर्षांपूर्वी चीनमधून (Chaina Corona Virus) कोरोना व्हायरसची सुरुवात झाली. त्यानंतर या महामारीने जगभरात धूमाकुळ घातला. एकीकडे संपूर्ण जग कोरोनासोबत लढा देत असताना, पक्षांमध्ये होणाऱ्या 'बर्ड फ्लू'चा प्रसार (Bird Flu Infection) आता माणसांना देखील होऊ लागला आहे. दरम्यान, एनआय या वृत्तसंस्थेने यूएस मीडियाच्या हवाल्याने म्हटले आहे की, 'बर्ड फ्लू'च्या H3N8 स्ट्रेनने मानवाला संसर्ग झाल्याचे पहिले प्रकरण सुरूवातीला चीनमधून समोर आले होते. चीनमध्ये 4 वर्षांच्या मुलामध्ये 'बर्ड फ्लू'चा H3N8 प्रकार आढळून आला होता. संक्रमित झालेला मुलगा हा पोल्ट्री फार्ममधील पक्षांच्या संपर्कात आला होता.

ब्रिटनमध्येही एकाला झाली होती लागण

याअगोदर, H5 'बर्ड फ्लू'चे पहिले प्रकरण ब्रिटनमध्ये आढळले होते, जिथे एक व्यक्ती पोल्ट्री फार्ममध्ये काम करत होती. अमेरिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोलोराडो मधील संक्रमित व्यक्तीबाबत संपूर्ण माहिती घेण्यात आली आहे. ही व्यक्ती शेतात काम करत असल्याने बाधित कोंबडीच्या संपर्कात होती. या व्यक्तीचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यानंतर 27 एप्रिलला आलेल्या अहवालात तो पॉझिटिव्ह आढळून आला आहे. यापूर्वी सुद्धा या व्यक्तीची चाचणी करण्यात आली होती, ज्यामध्ये तो निगेटिव्ह आढळला होता.

Bird Flu Infection
दिल्लीत कोरोनाचा कहर! 24 तासांत 100 हून अधिक कंटेनमेंट झोन, हजारच्या आसपास रुग्ण

अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'बर्ड फ्लू' ने संक्रमित झालेल्या व्यक्तीची पूर्ण काळजी घेण्यात येत आहे. तसेच त्याला आवश्यक औषधे सुद्धा देण्यात आली आहे. सध्या तो डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहे. अतिप्रमाणात थकवा जाणवत असल्याने ही व्यक्ती प्रथम डॉक्टरांकडे गेली, त्याच्या चाचणी अहवालानंतर त्याला अँटी-व्हायरल औषधे देण्यात आली. आता तो पूर्णपणे बरा आहे.

मानवाला 'बर्ड फ्लू' चा धोका किती?

अमेरिकंन डॉक्टरांच्या माहितीनुसार, सामान्य लोकांना 'बर्ड फ्लू' चा संसर्ग होण्याचा धोका कमी आहे. या फ्लूची एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला लागण होणे तसं दुर्मिळच आहे. अमेरिकेत या व्हायरसशी संबंधित इतर कोणतेही प्रकार आढळले नाहीत. डॉक्टर म्हणाले की, पोल्ट्रीमध्ये काम करणाऱ्यांना जास्त धोका असतो. अशा परिस्थितीत पक्षी निरीक्षकांनी सतर्क राहायला हवे. तसेच मेलेल्या किंवा आजारी दिसणाऱ्या पक्ष्यांपासून नागरिकांनी दूर राहावे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com