चिंता आणखी वाढली! देशात कोरोना रुग्णसंख्येत भर, 'अशी' आहे सद्यस्थिती

Coronavirus Live Updates: गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी आढळून आलेली रुग्णसंख्या अधिक आहे.
Corona virus
Corona virusSaam Tv
Published On

नवी दिल्ली: देशात कोरोना रुग्णसंख्या (Corona In India) झपाट्याने वाढत आहे. दैनंदिन कोरोना बाधितांच्या (Corona Cases) संख्येने तीन हजारांचा आकडा पार केला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशभरात ३ हजार ३७७ कोरोना बाधित रुग्णांची नोंद (Corona Positive) करण्यात आली, तर यादरम्यान ६० जणांचा मृत्यूही झाला आहे. देशात कोरोनावर उपचार घेणाऱ्या सक्रिय रुग्णांची संख्या १७ हजार ८०१ इतकी आहे. (Corona Latest News in Marathi)

Corona virus
दिल्लीत कोरोनाचा कहर! 24 तासांत 100 हून अधिक कंटेनमेंट झोन, हजारच्या आसपास रुग्ण

गेल्या महिनाभर देशातील दैनंदिन कोरोना बांधितांची संख्या ही ३ हजारांपेक्षा कमी नोंदली गेली होती, काही दिवस तर हा आकडा एक हजाराच्या खालीही आला होता. असं असतांना काही राज्यात विशेषतः दिल्लीत कोरोना बाधितांची (coronavirus in delhi) संख्या वाढत असल्यानं पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणेला अलर्ट करण्यात आलं आहे. दरम्यान, गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी आढळून आलेली रुग्णसंख्या अधिक आहे. गुरूवारी देशभरात ३ हजार ३०३ कोरोनाबाधित आढळून आले होते.

शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अपडेट केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण मृतांची संख्या ५,२३,७५३ झाली आहे. सक्रिय प्रकरणांमध्ये देखील ०.०४ टक्के वाढ झाली आहे. देशातील कोविड रिकव्हरी रेट ९८.७४ टक्के आहे. तर, आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४,३०,७२,१७६ वर पोहचली आहे. देशात आतापर्यंत ४,२५,३०,६२२ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सध्या देशात लहान मुले आणि प्रौढांना लसीकरण आणि बूस्टर डोस देण्याचे काम सुरू आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com