Bijapur Naxal Attack : छत्तीसगडमध्ये सुरक्षादलाच्या जवानांकडून ३ नक्षलवाद्यांचा खात्मा; आठवड्याभरात १६ जणांना कंठस्नान

Bijapur Naxal Attack Latest Update : तेलंगणाच्या सीमेजवळील छत्तीसगडच्या बीजापूर तालुक्यातील जिल्ह्यातील घनदाट जंगलात सुरक्षादलाच्या जवानांनी तीन नक्षलवाद्यांचा खात्मा केला, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
Bijapur Naxal Attack : छत्तीसगडमध्ये सुरक्षादलाच्या जवानांकडून ३ नक्षलवाद्यांचा खात्मा; आठवड्याभरात १६ जणांना कंठस्नान
Chhattisgarh Naxal AttackSaam Tv
Published On

Chhattisgarh Naxal Attack :

छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये सुरक्षादलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत ३ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यास सुरक्षादलाच्या जवानांना यश आलं आहे. तेलंगणाच्या सीमेजवळील छत्तीसगडच्या बीजापूर तालुक्यातील जिल्ह्यातील घनदाट जंगलात सुरक्षादलाच्या जवानांनी तीन नक्षलवाद्यांचा खात्मा केला, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

सुरक्षादलाच्या जवानांकडून नक्षलवाद्यांच्या विरोधात मोहीम आखली. या चकमकीविषयी अधिकारी म्हणाले, 'जंगलात नक्षलवादी आणि सुरक्षादलाच्या जवानांसोबत चकमक झाली. या चकमकीत तीन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तसेच घटनास्थळावरून हत्यारे देखील जप्त केले आहेत'.

Bijapur Naxal Attack : छत्तीसगडमध्ये सुरक्षादलाच्या जवानांकडून ३ नक्षलवाद्यांचा खात्मा; आठवड्याभरात १६ जणांना कंठस्नान
Chhattisgarh : दारू प्यायलेल्या शिक्षकाला विद्यार्थ्यांनी शिकवला धडा; चपलांनी मारहाण करत शाळेबाहेर पळवून लावलं

या भागात नक्षलविरोधी अभियानांतर्गत नक्षलवाद्यांच्या विरोधात कारवाई सुरु आहे. तीन दिवसांपूर्वी झालेल्या चकमकीत तीन महिलांसहित कमीत कमी १३ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलं होतं.

Bijapur Naxal Attack : छत्तीसगडमध्ये सुरक्षादलाच्या जवानांकडून ३ नक्षलवाद्यांचा खात्मा; आठवड्याभरात १६ जणांना कंठस्नान
Yavatmal Crime : रात्रीच्या अंधारात चोरट्यांची घरात एन्ट्री; चाकूचा धाक दाखवत ९ लाखांचा ऐवज लंपास

तीन दिवसांपूर्वी झालेल्या नक्षली आणि सुरक्षादलाच्या जवानांमध्ये आठ तास चकमक चालली. या भागात झालेल्या चकमकीत आतापर्यंत ४३ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यास यश आलं आहे.

पीटीआय वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, तीन दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांनी जंगलात आईईडी स्फोट केला होता. या घटनेत एका कमांडो जखमी झालो होता. त्यानंतर या जंगलात ऑपरेशन सुरु झालं होतं. या भागात १९ एप्रिलला मतदान होणार आहे. गंगापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जंगलात सकाळी सहा वाजता चकमक झाली. त्यानंतर सुरक्षादलाच्या जवानांनी ही कारवाई केली. या कारवाईत सुरक्षादलाच्या जवानानी घटनास्थळावरून नक्षलवाद्यांचे हत्यारे जप्त केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com