Bihar 500 Rs Fake Notes: आयपीएस, आयएएस होण्याची करत होते तयारी; पण 500 च्या नोटांनी तरुणांचा केला घात

Bihar Police : पोलिसांनी या तरुणांच्या घरातून तब्बल 1,77,000 रुपयांच्या बोगस नोटा जप्त केल्या आहेत.
Bihar 500 Rs Fake Notes
Bihar 500 Rs Fake Notessaam tv
Published On

Bihar Crime News: बॉलिवूड अभिनेता शाहीद कपूरच्या (Bollywood Actor Shahid Kapoor) 'फर्जी' वेब सीरिजप्रमाणे स्टाईल मारायला गेले आणि बिहारमध्ये दोन तरुण फसले. लोकसेवा आयोगाची तयारी करणारे दोन तरुण बोगस नोटा तयार करत होते. पण याच नोटांनी या तरुणांचा घात केला. या टोळीचा पर्दाफाश करण्यात बिहार पोलिसांना (Bihar Police) यश आले आहे. पोलिसांनी या तरुणांच्या घरातून तब्बल 1,77,000 रुपयांच्या बोगस नोटा जप्त केल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे.

Bihar 500 Rs Fake Notes
Kerala 5 People Death Case: केरळ हादरले! एकाच कुटुंबातील पाच जणांचा संशयास्पद मृत्यू, घरामध्ये 'या' अवस्थेत आढळले मृतदेह

मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या श्रीकृष्णापूरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आनंदपुरी परिसरात ही घटना घडली आहे. याठिकाणच्या राजाराम अपार्टमेंटमधील एका फ्लॅटवर बोगस नोटा तयार केल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी फ्लॅटवर छापा टाकला तर धक्कादायक माहिती समोर आली. घटनास्थळावरुन पोलिसांनी बोगस नोटा आणि दारुच्या बाटल्या जप्त केल्या.

पोलिसांनी याप्रकरणी दोन तरुणांना अटक केली. हे तरुण बोगस नोटा तयार करण्यासोबत अवैध दारुचा धंदा देखील करत होते. घटनास्थळावरुन पोलिसांनी 1,77,000 रुपयांच्या बोगस नोटा जप्त केल्या. यामध्ये 500 आणि 200 रुपयांचा समावेश आहे. त्याचसोबत अर्धवट छापलेल्या नोटा, प्रिंटर, केमिकल आणि बोगस नोटा झापण्यासाठी आणलेल्या कागदांचे बडल पोलिसांनी जप्त केले.

Bihar 500 Rs Fake Notes
Bengaluru Congress Worker Death : होर्डिंग लावण्यावरून वाद टोकाला; बेंगळुरूत काँग्रेस कार्यकर्त्याची निर्घृण हत्या

याप्रकरणी पोलिसांनी रत्न यादव आणि याकूब खान या दोन तरुणांना अटक केली. पोलीस छापा टाकायला आल्याचे पाहून आरोपींनी बिल्डिंगमधून उडी मारुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा प्रयत्न फसला. उंचावरुन उडी मारल्यामुळे ते जखमी झाले. पोलिसांनी त्यांना अटक करुन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या आरोपींची चौकशी केली असता जी माहिती समोर आली ती ऐकून पोलिसही चक्रावले. हे दोघेही राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षेची तयारी करत होते. दरम्यान, या प्रकरणात आणखी काही विद्यार्थ्यांचा समावेश आहे की नाही या बाजूनेही तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com