Bengaluru Congress Worker Death : होर्डिंग लावण्यावरून वाद टोकाला; बेंगळुरूत काँग्रेस कार्यकर्त्याची निर्घृण हत्या

Bengaluru Crime News: याप्रकरणी 5 ते 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.
Bengaluru News
Bengaluru NewsSaam Tv
Published On

Bengaluru News: कर्नाटकातील बेंगळुरूमध्ये (Bengaluru) एका काँग्रेस कार्यकर्त्याची निर्घृण हत्या (Congress Worker Death) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मोटारसायकलवरून आलेल्या 5 जणांनी या काँग्रेस कार्यकर्त्याची हत्या केली. या हल्ल्यामध्ये 42 वर्षीय रवी उर्फ ​​मथिरावी असे या काँग्रेस कार्यकर्त्याचे नाव आहे. नंदिनी लेआऊट पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

Bengaluru News
Hyderabad Crime News: दगड कापण्याच्या मशीनने केले प्रेयसीचे तुकडे अन्...; हैदराबादमधील काळजाचा थरकाप उडवणारी घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस कार्यकर्ता रवीची हत्या करण्यात आली आहे. शहरातील चौंडेश्वरी नगरमध्ये दुचाकीवरून आलेल्या 5 ते 6 जणांनी रवीची निर्घृणपणे हत्या केली. रात्री उशिरा मारेकऱ्यांनी रवीवर धारदार शस्त्रांनी वार केले. त्यानंतर दगडांने ठेचून त्यांची हत्या केली. व्यवसायाने ड्रायव्हर असलेले रवी स्थानिक काँग्रेस नेते कृष्णमूर्ती यांचे समर्थक होते.

कृष्णमूर्ती यांच्या वाढदिवसानिमित्त रवीने होर्डिंग्ज लावले होते. याचा मुद्द्यावरुन वाद निर्माण झाला. हाच मुद्दा पुढे करत मारेकऱ्यांनी रवीच्या घराबाहेरील होर्डिंग्ज फाडून टाकले. त्याला विरोध केल्यामुळे त्यांनी त्यांची हत्या केली. कर्नाटकात नुकतेच काँग्रेसचे सरकार स्थापन झाले आहे. यानंतर काँग्रेस कार्यकर्त्याच्या हत्येवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पण या हत्येमागे काही राजकीय कारण आहे का हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Bengaluru News
Kerala 5 People Death Case: केरळ हादरले! एकाच कुटुंबातील पाच जणांचा संशयास्पद मृत्यू, घरामध्ये 'या' अवस्थेत आढळले मृतदेह

बेंगळुरुतल्या चौंडेश्वरी नगर येथे घडलेल्या या हत्या प्रकरणी नंदिनी लेआऊट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मारेकऱ्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे. पोलिसांनी रवीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी व्हिक्टोरिया हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला. या घटनेमुळे बंगळुरुमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून या हत्या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

दरम्यान, मागच्या आठवड्यात बेंगळुरूच्या होस्कोटे तालुक्यात काँग्रेस पक्षाचा विजय साजरा होत असताना अशीच घटना समोर आली होती. त्यादरम्यान एका व्यक्तीची त्याच्या नातेवाईकांनी कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याचा आरोप करण्यात आला होता. 56 वर्षीय कृष्णप्पा असे मृताचे नाव आहे. बंगळुरू ग्रामीण पोलिसांच्या अखत्यारीतील डी शेट्टीहल्ली गावात ही घटना घडली होती. याप्रकरणी कृष्णप्पा यांचा भाचा आदित्य (21) याला अटक करण्यात आली होती. कृष्णप्पा आणि त्याचा भाऊ गणेश यांच्यात जुने वैर असल्याची माहिती मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com