
बिहारच्या भागलपूरमध्ये एका व्यक्तीवर चोरीच्या संशयातून अमानुष छळ
पीडित नवीन कुमार याच्या गुप्तांगात पेट्रोल ओतण्याचा प्रकार उघडकीस
आरोपींनी ३ दिवस बंधक ठेवून मारहाण
आरोपींविरोधात झंडापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
बिहारच्या भागलपूरमधून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गावगुंडांनी ३ दिवसांपासून एका व्यक्तीला चोरीच्या आरोपातून बंधक करत गुप्तांगात पेट्रोल ओतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ४ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. झंडापूर ओपी पोलीस स्टेशनच्या हद्दीत दयालपूर गावात ही घटना घडली आहे. पीडित व्यक्तीसोबत झालेल्या अमानुष छळाच्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवीन कुमार असे पीडित व्यक्तीचे नाव आहे. नवीन कुमार हा दयारपूर येथील रहिवाशी आहे. नवीनने ४ जणांच्या विरोधात झंडापूर ओपी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला. भवनपूर गावाचे प्रमुख विनीत कुमार सिंह उर्फ बंटी सिंह यांच्या विरोधातही तक्रार नोंदवण्यात आली. दयालपूरच्या अजय सिंह, ललित सिंह, पप्पू सिंह यांच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे.
पीडित तरुणाच्या आरोपानुसार, दयालपूरचा रहिवाशी अजय सिंहने ३१ ऑगस्ट रोजी घरी बोलावलं. त्यानंतर बंधक बनवून मानसिक छळ केला. याचदरम्यान गुप्तांगात पेट्रोल ओतलं. तसेच १ लाख ३५ हजार रुपये घेणार असल्याचेही कबूल करायला भाग पाडलं. माझ्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
एफआयआरमध्ये पीडित व्यक्तीने म्हटलं की, 'गावातील सोनू कुमार नावाच्या एका तरुणाला ३५००० रुपये देण्याचे कबूल करण्यास भाग पाडलं. रुग्णालयात दाखल झालेल्या पीडित व्यक्तीने म्हटलं की, 'अजय सिंहच्या घरातून रक्कम चोरी झाल्याचा आरोप आमच्यावर ढकलण्यात आला. आम्ही घरात चोरी केली नाही. माझ्यावर चुकीचा आरोप करण्यात आला. मला घरी बोलावून बंधक केलं'.
पीडित व्यक्तीने पुढे सांगितलं की, 'मी पैसे देण्याचे कबूल करत नव्हतो. परंतु इंजेक्शनच्या मदतीने माझ्या गुप्तागांत ५ वेळा पेट्रोल ओतलं, तेव्हा मी चोरी केल्याचं कबूल केलं. पेट्रोल एका पाण्याच्या बॉटलमध्ये ठेवलं होतं. इंजेक्शन १० मिलीचं होतं'.
'घराचं कुलुप तोडून पैसे चोरल्याचा अजय सिंहचा आरोप आहे. पंचायतीत नवीन कुमारने दीड वर्षांत पैसे परत करणार असल्याची कबुली दिली होती. परंतु पैसे द्यायचे नसल्याने खोटा आरोप केला जात असल्याचे अजय सिंह यांनी म्हटलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.