Shocking : भयंकर! सून घरात एकटीच, सासरा आणि २ दीर छप्पर तोडून घरात घुसले ; पुढे जे घडलं त्याने पायाखालची जमीन हादरली

Bihar Crime News : बिहारच्या नवादा जिल्ह्यात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलीच्या लग्नाला नणंदेला निमंत्रण न दिल्याच्या वादातून एका महिलेची हत्या झाल्याचा आरोपी सासरा आणि दोन दीर फरार असून पोलीस तपास सुरू आहे.
BIHAR SHOCKER: WOMAN ALLEGEDLY KILLED BY IN-LAWS OVER DAUGHTER'S WEDDING INVITATION DISPUTE
BIHAR SHOCKER: WOMAN ALLEGEDLY KILLED BY IN-LAWS OVER DAUGHTER'S WEDDING INVITATION DISPUTESaam Tv
Published On
Summary
  • बिहारच्या नवादा जिल्ह्यात कौटुंबिक वादातून एका महिलेची हत्या

  • मुलीच्या लग्नाला नणंदेला निमंत्रण न दिल्यामुळे कुटुंबात तणाव

  • सासरा आणि दोन दिरांनी मिळून महिलेला मारहाण केल्याचा आरोप

  • घटनेनंतर तिन्ही आरोपी फरार

नात्यांमध्ये भांडण होणं स्वाभाविक आहे. मात्र ही क्षुल्लक भांडण तात्काळ सोडवणं गरजेचं आहे. कारण या आपापसातील कलहांनी जर रौद्र रूप घेतलं तर होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. अशीच एक धक्कादायक घटना बिहारच्या नवादा जिल्ह्यात घडली आहे. मुलीच्या लग्नाला नणंदेला निमंत्रण न दिल्याच्या कारणावरून घरातील सुनेची निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी मृत महिलेचा सासरा आणि २ दिरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे तिघेही फरार असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना नवादा जिल्ह्यातील नरहट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हजरतपूर गावात घडली. मृत महिलेच नाव पुतुल देवी असे असून त्या आपल्या दोन मुलं आणि एका मुलीसोबत गावात राहत होत्या. त्यांचे पती बाल्मिकी चौधरी हे दक्षिण आफ्रिकेत वेल्डर म्हणून काम करत असल्याने ते परदेशातच होते.

BIHAR SHOCKER: WOMAN ALLEGEDLY KILLED BY IN-LAWS OVER DAUGHTER'S WEDDING INVITATION DISPUTE
Snake : पावसाळ्यात सापांना 'ही' ६ झाडे आवडतात, कारण वाचून येईल चक्कर

नेमकं काय घडलं?

सुमारे दोन महिन्यांपूर्वी पुतुल देवी यांच्या मुलीचे लग्न झाले होते. या लग्नासाठी त्यांच्या नणंदेला निमंत्रण देण्यात आले नव्हते. यापूर्वी झालेल्या एका मुंडन समारंभालाही तिला बोलावण्यात आले नसल्याने कुटुंबात नाराजी निर्माण झाली होती. याच कारणावरून अनेक दिवसांपासून वाद सुरू असल्याचे सांगितले जात आहे. गुरुवारी सायंकाळी या वादाने गंभीर स्वरूप धारण केले. पुतुल देवी यांचा मुलगा भूपेश कुमारने आरोप केला की, त्याचे आजोबा आणि दोन काकांनी मिळून त्याच्या आईला बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी घर सोडून फरार झाले असल्याचेही त्याने सांगितले.

BIHAR SHOCKER: WOMAN ALLEGEDLY KILLED BY IN-LAWS OVER DAUGHTER'S WEDDING INVITATION DISPUTE
Monsoon Tips : पावसाळ्यात घरात पालींचा वावर वाढला? 'हे' उपाय वेळीच करा नाही तर...

आरोपी घरात कसे आले?

भूपेशच्या म्हणण्यानुसार, घटनेच्या वेळी तो आणि त्याचा भाऊ कामानिमित्त बाहेर गेले होते, तर वडील परदेशात होते. घरात पुतुल देवी एकट्याच असल्याचा फायदा घेत आरोपी छतावरून घरात घुसले आणि त्यांच्यावर हल्ला केला. त्याने जोगिंद चौधरी, साधू चौधरी आणि संजय चौधरी यांच्यावर थेट हत्येचा आरोप केला आहे. घटनेची माहिती मिळताच नरहट पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. कौटुंबिक वादातून घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com