दुहेरी हत्याकांडाचा थरार; रस्त्याच्या कडेला आढळला वडील अन् मुलाचा मृतदेह, नेमकं घडलं काय?

Father and Son Shot Dead: बिहारमधून धक्कादायक बातमी समोर. रस्त्याच्या कडेला वडील अन् मुलाचा मृतदेह आढळला. पोलिसांकडून कसून तपास सुरू.
Father and Son Shot Dead
Father and Son Shot DeadSaam Tv
Published On
Summary
  • रस्त्याच्या कडेला वडील अन् मुलाचा मृतदेह आढळला.

  • गोळीबारातून हत्या झाल्याचा संशय.

  • पोलिसांनी तपासाला सुरूवात केली.

बिहारमधील आरा येथील बेलघाट गावाजवळ एक धक्कादायक घटना घडली. रस्त्याच्या कडेला वडील आणि मुलाचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, दोघांची हत्या गोळीबारातून झाल्याची माहिती समोर आली आहे. हत्येमागील कारण मु्ख्य कारण समोर आले नसून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रमोद महतो आणि प्रियांशु महतो अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. प्रियांशु याचं लग्न ठरलं होतं. साखरपुड्यासाठी दोघेही बाजारात गेले होते. मात्र, रात्र झाली तरीही दोघेही परतले नव्हते. शुक्रवारी सकाळी बेलघाट गावाजवळ गावकऱ्यांना त्यांचे मृतदेह दिसले. रस्त्याच्या कडेला त्यांचे निदर्शनास आले.

Father and Son Shot Dead
प्रसिद्ध कथावाचकाचं अश्लील कांड; कारमध्ये महिलेसोबत शरीरसंबंध ठेवताना रंगेहाथ पकडलं, नागरिकांनी चोप देत शेंडी कापली

ग्रामस्थांनी याची माहिती मुफस्सिल पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच तपासाला सुरूवात केली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवले. प्राथमिक तपासात दोघांचाही गोळीबारात हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. घटनास्थळावरून पोलिसांना काही काडतुसेही सापडली.

Father and Son Shot Dead
MPSC विद्यार्थिनीला लग्नाचं खोटं वचन; उद्योगपतीकडून वारंवार शारीरिक संबंध, बारामतीत नेमकं काय घडलं?

मृतक प्रमोद महतो हे स्थानिक पातळीवरील एक प्रसिद्ध व्यक्ती होते. त्यांची हत्या नेमकी का करण्यात आली? हत्येमागीव हेतू स्पष्ट झाले नाही. सध्या पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. आरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एक विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. संशयितांची चौकशी केली जात आहे', अशी माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com