NCP News: अरुणाचल प्रदेशाच्या विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून ८ उमेदवार जाहीर; स्वबळावर लढवणार निवडणूक

Arunachal Pradesh Vidhan Sabha: पक्षातर्फे सोमवारी अरुणाचल प्रदेशातील जनसंपर्क कार्यक्रमादरम्यान उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. एनडीएचा घटक पक्ष म्हणून वावरत असताना राष्ट्रवादीने अरुणाचल प्रदेशात उमेदवारी जाहीर केल्याने वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
Arunachal  Pradesh Vidhan Sabha NCP
Arunachal Pradesh Vidhan Sabha NCP

Arunachal Pradesh Assembly Election NCP Candidate :

राज्यात एनडीएचा घटक म्हणून वावरणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने अरुणाचल प्रदेशात मोठी खेळी केलीय. अरुणाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत मित्र पक्षाला बाजुला सारत आपल्या आठ उमेदवारांची नावे घोषणा राष्ट्रवादीकडून करण्यात आलीय. यामुळे अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट झालंय. (Latest News)

उमेदवारांची नावे जाहीर करण्याच्या काही दिवसांपूर्वी अरुणाचल प्रदेशच्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांची देखील भेट घेतली होती. मिळालेल्या माहितीनुसार, पक्षातर्फे सोमवारी अरुणाचल प्रदेशातील जनसंपर्क कार्यक्रमादरम्यान उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. त्यात माजी आमदार लिखा साया, माजी मंत्री तपांग तलोह, लोमा गोलो, न्यासम जोंगसम, न्गोलिन बोई, अजू चिजे, मंगोल योमसो आणि सलमान मोंगरे यांचा समावेश आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राष्ट्रवादीने घोषित केलेले उमेदवार -

1- लिखा साया- 16-याचुली विधानसभा

2- तपंग तलोह- 35-पंगिन विधानसभा

3- लोमा गोलो- 12-पक्के-केसांग विधानसभा

4-न्यासन जोंगसम- 53-चांगलांग उत्तर विधानसभा

5- नगोलिन बोई- 54-नामसांग विधानसभा

6- अजु चिजे- 33-मेहचूका विधानसभा

7- मोंगोल यामसो- 40-मनियांग-जेकु विधानसभा

8- वकील सलमान मोंगरे- 52- चांगलांग दक्षिण विधानसभा

राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा असलेले लिखा साया हे याचुली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. तर तपंग तलोह पैंगीन-बोलेंगमधून निवडणूक लढवणार आहेत. उमेदवारांची नावे जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाकडून एक प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आले आहे. या उमेदवारांची निवड "राज्यातील लोकांच्या हितासाठी आणि राष्ट्रवादीच्या मूल्यांचे पालन करण्यासाठी कटिबद्ध असलेल्या व्यक्तींचा पक्षाने काळजीपूर्वक विचार केला असल्याचं पक्षाच्या राज्य युनिटच्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय.

Arunachal  Pradesh Vidhan Sabha NCP
NCP News : राष्ट्रवादी काँग्रेस आणि घड्याळ चिन्ह मिळाल्यानंतर अजित पवार 'अ‍ॅक्शन मोड'वर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com