
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सत्ताधारी भाजपला घेरण्यासाठी विरोधकांनी इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. दुसरीकडे भाजपने देखील एनडीएमधील घटक पक्षांसोबत बैठकीचा धडाका लावला आहे. अशातच लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसला आहे. एनडीएमधील सर्वात मोठा घटक पक्ष बाहेर पडला आहे. (Latest Marathi News)
भाजपचा मित्र पक्ष असलेल्या अन्नाद्रमुकने (AIADMK) एनडीएची साथ सोडली आहे. सोमवारी (२५ सप्टेंबर) अण्णाद्रमुकची एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. अण्णाद्रमुकचे डेप्युटी कोऑर्डिनेटर केपी मुनुसामी यांनी एनडीएतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली आहे
अण्णाद्रमुकने एनडीएतून वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याने दक्षिणेतील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. भाजपचे तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांच्या वादग्रस्त विधानांमुळे ही युती तोडत असल्याचं अण्णाद्रमुकने स्पष्ट केलं आहे. अन्नामलाई यांनी द्रविडियन आयकॉन सीएन अण्णादुराई यांच्यावर टिप्पणी केली होती.
या टीकेचा अण्णाद्रमुकच्या नेत्यांनी जोरदार विरोध केला होता. आमच्या नेत्यांच्या विरोधात करण्यात आलेली टीका खपवून घेतली जाणार नाही. आम्ही एनडीएचा भाग असूनही आमच्या विरोधात टीका केली जात असेल तर आघाडीत राहण्यात काय अर्थ? असा सवाल अण्णाद्रमुक यांनी केला होता.
इतकंच नाही, तर अन्नाद्रमुक पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी अण्णामलईंना माफी मागण्यास सांगितले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अण्णामलाई यांच्या माफीनाम्याबाबत भाजपकडून एकमत होऊ शकले नाही, त्यानंतर युती तुटली आणि दोन्ही पक्ष वेगळे झाले.
दरम्यान, अण्णाद्रमुकने गेल्याच आठवड्यात भाजप आणि एनडीएमधून बाहेर पडण्याची घोषणा केली होती. त्यानंतर सोमवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीत सर्व नेत्यांच्या संमतीने एनडीएमधून बाहेर पडण्याचा ठराव झाला. यानंतर अन्नाद्रमुकने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.