Slowest Traffic In India : वाहतूक कोंडीत देशात भिवंडी ५व्या स्थानी; टॉप १० मध्ये महाराष्ट्रातील आणखी २ प्रमुख शहरं

Maharashtra Traffic News : वाहूतक कोंडीत मुंबई-पुणे याचे नाव देखील जोडण्यात आले आहे.
Slowest Traffic In India
Slowest Traffic In India Saam Tv
Published On

Slowest Traffic Cities :

दिवसेंदिवस वाढत जाणारी ट्रॅफिक आणि प्रदूषण यामुळे जगभरात अनेक लोक त्रस्त आहेत. वाढत्या प्रदूषणामुळे अनेक आजारांना बळी पडावे लागते. कामाच्या ठिकाणी लवकर पोहोचता यावे किंवा फॅमिलीसोबत फिरता यावे यासाठी दुचाकी किंवा चारचाकी खरेदी केली जाते. परंतु, वाढत्या वाहतूक कोंडीमुळे आपल्या नाकी नऊ येतात.

वाहतूक कोंडीमध्ये मुंबई-पुणे शहरांचे नाव पहिल्या यादीत आहे तर दिल्ली-गुरुग्रामचा देखील यात समावेश आहे. देशभरात सर्वाधिक वाहूतक कोंडीत महाराष्ट्रात पाहायला मिळते. सगळ्यात जास्त प्रमाणात ट्रॅफिक ही भारतातील ३ प्रमुख शहरांमध्ये आहे असे सर्वेक्षणातून समोर आले. त्यात मुंबईचे स्थान कितव्या क्रमांकावर हे जाणून घेऊया

Slowest Traffic In India
Bhiwandi One Day Trip: ठाणे जिल्ह्यातील भिंवडीतही आहेत फिरण्याची ठिकाणे; वन डे ट्रिप होईल अविस्मरणीय

1. या शहराचा समावेश

वाहतूक (Traffic) कोंडीमध्ये जगातील टॉप १० मध्ये भारतातील ३ शहरांचा समावेश आहे. अमेरिकेतील एका सरकारी संस्थेच्या अहवालात असे म्हटले आहे. वाहतूक कोंडीत पश्चिम बंगालमधील कोलकाता, महाराष्ट्रातील भिंवडी (Bhiwandi) आणि बिहारमधील अराहाचा जगातील टॉप १० मध्ये समावेश करण्यात आला आहे.

2. अहवाल काय सांगतो?

नॅशनल ब्युरो ऑफ इकॉनॉमिक रिचर्स (NBER)च्या अहवालानुसार 152 देशांतील (World) १२०० हून अधिक शहरांचा समावेश करण्यात आला आहे. या अहवालानुसार वाहतूक कोंडीत अमेरिका आणि बांग्लादेशचा समावेश आहे. कोलंबियामधील बोगोटा हे सर्वात गजबजलेले शहर आहे. त्यात वाहूतक कोंडीमध्ये बांग्लादेश, भारत आणि नायजेरियाचा समावेश आहे.

Slowest Traffic In India
Dengue Platelets Count Increase: डेंग्यूमुळे शरीरातील पेशी कमी झाल्या आहेत? हे फळ ठरेल रामबाण

3. वाहतूक कोंडीत मुंबई कितव्या स्थानावर?

संशोधनात भिवंडी पाचव्या स्थानावर, कोलकाता सहाव्या स्थानावर तर आरा सातव्या क्रमांकावार आहे. यामध्ये बिहार शरीफ हे ११ व्या स्थानावर, मुंबई १३ व्या, आयझॉल १८ व्या, बेंगळुरु १९ व्या आणि शिलाँग २० व्या स्थानावर आहे. तर दिल्ली ही २० व्या क्रमांकवर आहे. हे संशोधन गुगल मॅपवरुन केले असून हा अहवाल १२ जून ते ५ नोव्हेंबर २०१९ दरम्यानचा आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com