कोमल दामुद्रे
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात डेंग्यूचा प्रादूर्भाव वाढतो आहे.
हा आजार डासांमुळे होत असून अनेक लोक गंभीर समस्येने त्रस्त आहेत.
या आजारात झपाट्याने आपल्या पेशी कमी होतात अशावेळी आहारात कोणते पदार्थ खायला हवे हे जाणून घेऊया.
डॉक्टरांचे असे मत आहे की, आहारात काही गोष्टींचा समावेश केला तर पेशी वाढवण्यास मदत होते.
डेंग्यूमध्ये पेशी वाढवण्यासाठी किवी फायदेशीर ठरते.
किवीमध्ये व्हिटॅमिन सी-ई, व्हिटॅमिन के, फोलेट आणि पोटॅशियम असते. जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. तसेच शरीरातील पेशी देखील वाढवते.
तसेच पेशी वाढवण्यासाठी संत्री, लिंबू, द्राक्षे, बेरी आणि व्हिटॅमिन सी असणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा.