Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेत राहुल गांधींसोबत फक्त महिलाच दिसणार; पाहा काय आहे कारण?

सध्या राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमधून एक महत्वाची बातमी समोर येत असून राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत आज (९, जानेवारी) फक्त महिलाच दिसणार आहेत.
bharat jodo yatra
bharat jodo yatra saam tv

Bharat Jodo Yatra: कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला सध्या जोरदार प्रतिसाद करताना मिळताना दिसत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेली भारत जोडो यात्रा सध्या हरियाणामध्ये आहे. देशभरात थंडीची लाट सुरू असतानाही राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत आहे.

सध्या राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमधून एक महत्वाची बातमी समोर येत असून राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) भारत जोडो यात्रेत आज (९, जानेवारी) फक्त महिलाच दिसणार आहेत. काय आहे यामागील महत्वाचे कारण, चला जाणून घेवू.

bharat jodo yatra
Amruta Dhongade: अमृता धोंगडेची घरातून बाहेर पडताच भावूक पोस्ट, '...पण स्वप्न अर्धवटच राहिलं'

याबाबत अधिक माहिती अशी की, कॉंग्रेस नेते राहुल गांधींची जोडो यात्रा सध्या हरियाणामध्ये आहे. या यात्रेला महिलांचा मिळणारा प्रतिसाद अभूतपुर्व आहे. त्याचबरोबर महिला सशक्तिकरणासाठी या यात्रेमध्ये फक्त महिलाच दिसणार आहेत. महिला सशक्ती करणासाठी राहुल गांधी प्रचंड आग्रही आहेत. यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला आहे. याबद्दल पक्षाचे खासदार ज्योतीमली यांनी माहिती दिली आहे.

त्याचसोबत कॉंग्रेस (Congress) पक्षाचे नेते जयराम रमेश यांनीही याबाबतचे ट्विट केले आहे. याआधीही राहुल गांधींनी राजस्थानमध्येही फक्त महिलांसोबत कदमताल केला होता. तसेच माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या जयंतीदिवशीही त्यांनी फक्त महिलांसोबत यात्रेत चालताना दिसले होते.

bharat jodo yatra
Pune : शिक्षण क्षेत्रातील मोठा घोटाळा; पुण्यातील CBSEच्या आणखी 10 शाळा रडारवर

दरम्यान , राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या अंतिम टप्प्यात असून ३० जानेवारीपर्यंत ती श्रीनगरमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. श्रीनगरमध्ये ध्वज फडकावून कॉंग्रेसची ही यात्रा समाप्त होणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार भारत जोडो यात्रेत संजय राऊतही सहभागी होणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com