Cyber Crime: सावधान! व्हॉट्सअॅपवर वीजबिलासंबंधीत तुम्हालाही मेसेज आलाय का? जाणून घ्या, अन्यथा बुडतील तुमचे पैसे

तुम्हीही वीज बिल ऑनलाइन भरता का? जर तुमचे उत्तर होय असेल तर सावध व्हा
Cyber Crime
Cyber CrimeSaam Tv
Published On

Cyber Crime: तुम्हीही वीज बिल ऑनलाइन भरता का? जर तुमचे उत्तर होय असेल तर सावध व्हा, फसवणूक करणारे लोक व्हॉट्सअॅपवर (Whatsapp) वीज बिलचे बनावट मेसेज पाठवून फसवणूक करण्याचे नवीन मार्ग शोधत आहेत. (Cyber Crime)

यावेळी हॅकर्स व्हॉट्सअॅपच्या मदतीने बनावट वीजबिल पाठवतात. हॅकर्स व्हॉट्सअ‍ॅपवर कुणाची फसवणूक करण्यासाठी अशा प्रकारचा डाव अवलंबण्याची ही पहिलीच वेळ नाही .

Cyber Crime
Modi Government : मोदी सरकारचं रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, ११.२७ लाख कामगारांना मिळणार दिवाळी बोनस

युजर्सनी ट्विटरवर माहिती दिली -

अनेक ट्विटर युजर्सनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. युजर्सच्या ट्विटवरून असे समोर आले आहे की, यूजर्सना व्हॉट्सअॅपवर असे मेसेज येत आहेत, यूजर्सचे म्हणणे आहे की या नंबरवर कॉल डायल केल्यावर त्यांना वीज बिल भरण्यास सांगितले जाते, तसे न केल्याने वीज खंडित करण्याची धमकी दिली जाते.

या शहरांमध्ये सर्वाधिक प्रकरणे समोर येत आहेत -

असे वीज बिल घोटाळे महाराष्ट्र, गुजरात आणि ओडिशासह इतर शहरांमधून सर्वाधिक समोर येत आहेत. मेसेजमध्ये लिहून काय येत आहे, याची माहिती देऊ.

Cyber Crime
IAF Plane Crashed : गोव्यात भारतीय हवाई दलाचं विमान क्रॅश

मेसेजमध्ये लिहीले आहे की प्रिय ग्राहक, तुमचे बिल अपडेट झाले नाही त्यामुळे तुमची वीज रात्री ९:३० वाजता खंडित होईल. तत्काळ वीज कार्यालयाशी संपर्क साधा, यासोबतच संदेशात एक क्रमांकही दिसत आहे.

व्हॉट्सअॅप स्कॅमपासून स्वत:ला सुरक्षित ठेवा अशाप्रकारे, पहिल्यांदाच असे मेसेज विश्वासार्ह म्हणजेच खरे वाटतात, परंतु या प्रकारच्या मेसेजमध्ये कुठेतरी अप्परकेस अक्षरांऐवजी लहान अक्षरांचा वापर करण्यात आल्याचे तुम्ही पाहू शकता. असे मेसेज पाठवून हॅकर्स अशा लोकांना टार्गेट करतात जे अनेकदा वीज बिल भरण्यास विसरतात.

Edited By - Shraddha Thik

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com