UP Crime News : क्रिकेट खेळताना क्लिन बोल्ड केलं म्हणून गोलंदाजाची मैदानातच हत्या, उत्तर प्रदेशातील खळबळजनक घटना

Cricket Crime News : फलंदाजाने गोलंदाजाची गळा दाबून हत्या केली आहे.
Womens Cricket
Womens CricketSaam Tv
Published On

UP Crime News : क्रिकेट अनेकांचा आवडता खेळ. मात्र खेळ म्हटला की तिथ वादविवाद आलेच. मात्र एखादा खेळ खेळताना मैदानात झालेला वाद खिलाडूवृत्तीने घ्यावं असं नेहमी म्हटलं जात. मात्र सगळ्यांनाच ते जमत नाही. अशीच एक घटना उत्तर प्रदेशमधून समोर आली आहे, जिथे क्रिकेटच्या वादातून एका तरुणाला जीव गामवावा लागला आहे.

कानपूरमध्ये काही मुलं आपापसात क्रिकेट खेळत होती. खेळादरम्यान गोलंदाजाने फलंदाजाला क्लीन बोल्ड केले. मात्र यातून फलंदाज इतका संतापला की त्याने गोलंदाजाचा गळा दाबून खून केला. घटनेनंतर आरोपींना घटनास्थळावरुन पळ काढला.  (Latest Marathi News)

Womens Cricket
Nashik Accident News : भरधाव कारचा टायर फुटला अन् अघटित घडलं, दुचाकीवरुन जाणाऱ्या दोन युवकांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, घटमपूर परिसरातील रेवन्ना भागातील गावात ही घटना घडली आहे. सोमवारी सायंकाळी गावात काही मुले क्रिकेट खेळत होती. हरगोविंद नावाचा मुलगा फलंदाजी करत होता आणि सचिन गोलंदाजी करत होता. सचिनने आपल्या वेगवान गोलंदाजीने हरगोविंदला बाद केले. यामुळे हरगोविंद चिडला आणि भांडू लागला.

यादरम्यान हरगोविंदचा भाऊही घटनास्थळी पोहोचला आणि दोघांनी मिळून सचिनचा गळा आवळून खून केला. हत्येची माहिती मिळताच सचिनच्या कुटुंबियांनी धावत येऊन त्याला उचलून घाटमपूर रुग्णालयात नेले. जिथे तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. (Crime News)

Womens Cricket
Pune Crime News: पुणेकर सावधान! कोयता गँगनंतर रुमाल गँग सक्रिय; रात्रीच्या अंधारात वाहनांची तोडफोड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताच्या नातेवाईकांकडून कोणतीही तक्रार आलेली नाही. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. मात्र पोलिसांकडून एफआयआर नोंदवून कारवाई केली जाईल, असं अंदाज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com