Bangladesh Protest : बांगलादेशमध्ये आरक्षणावरून हिंसाचार; आतापर्यंत ३९ जणांचा मृत्यू, २५०० जखमी, रस्त्यावर सैनिकांचा मोठा फौजफाटा

Bangladesh Protest Update : बांगलादेशमध्ये आरक्षणावरून हिंसाचार झालाय. आतापर्यंत ३९ जणांचा मृत्यू, २५०० जखमी झाले आहेत. रस्त्यावर सैनिकांचा मोठा फौजफाटा पाहायला मिळत आहे.
बांगलादेशमध्ये आरक्षणावरून हिंसाचार; आतापर्यंत ३९ जणांचा मृत्यू, २५०० जखमी, रस्त्यावर सैनिकांचा मोठा फौजफाटा
Bangladesh ProtestGoogle
Published On

नवी दिल्ली : बांगलादेशमध्ये सरकारी नोकरीतील आरक्षणावरून वातावरण तापलं आहे. सरकारी नोकरीतील आरक्षणाच्या विरोधात बांगलादेशातील शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. या आरक्षणाच्या विरोधात झालेल्या हिंसाचारत आतापर्यंत ३९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २५०० हून अधिक आंदोलनकर्ते जखमी झाले आहेत. आंदोलनकर्त्यांकडून बस आणि खासगी वाहनांची जाळपोळ सुरु आहे.

आरक्षणाच्या विरोधामुळे झालेल्या हिंसाचारात बांगलादेशात बस, ट्रेन आणि मेट्रो सेवा ठप्प झाली आहे. हिंसाचार रोखण्यासाठी सरकारने इंटरनेट बंद केलं आहे. कॉलेज, प्राथनास्थळे बंद करण्यात आली आहे. पूर्ण देशभरात हिंसाचार नियंत्रणात आणण्याासाठी मोठ्या प्रमाणात सैनिकांना रस्त्यावर उतरवण्यात आलं आहे.

सरकारी माध्यमांवर हल्ला

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी सरकारच्या नॅशनल टेलीव्हिजनवर देशाला संबोधित केलं. या निवेदनात पंतप्रधान हसीना यांनी नागरिकांना शांततेचं आवाहन केलं आहे. मात्र, पंतप्रधान हसीना यांच्या आवाहनानंतर आंदोलनकर्ते आणखी आक्रमक झाले आहेत. त्यांनी सरकारी टेलिव्हिजनचं कार्यालयलाच आग लावली. या कार्यालयात अनेक पत्रकारांसहित १२०० कर्मचारी उपस्थित होते. पोलीस प्रशासनाने मोठ्या शिताफीने त्यांचा बचाव केला.

आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी रबरच्या गोळ्या आणि अश्रूधूराच्या नळकांड्या फोडल्या. यात अनेक आंदोलकर्ते गंभीर जखमी झाले आहेत. तेथील अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याचे निर्देश दिले आहेत. ढाका आणि संपूर्ण देशातील बस सेवा बंद करण्यात आली आहे. ढाकाच्या गबटोली आणि सईदाबाद बस टर्मिनलवरील कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या बस न चालवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

ढाका टाइम्सच्या रिपोर्टनुसार, त्याच्या एका पत्रकाराचा ढाका येथील हिंसाचाराचं वृत्तांकन करताना मृत्यू झाला आहे. आंदोलनकर्त्यांनी ढाकामध्ये कनाडा विद्यापीठात संकुलात आंदोलन केलं. यावेळी विद्यापीठाच्या छतावर ६० पोलीस कर्मचारी अकडले होते. त्यांचा हेलिकॉप्टरच्या मदतीने बचाव करण्यात आला आहे.

भारतीयांसाठी ॲडव्हायझरी जारी

बांगलादेशात सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाला विरोध करत आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाने हिंसक वळण घेतलं आहे. यामुळे देशातील अनेक भागात हिंसाचार सुर आहे. या हिंसाराच्या घटनेमुळे शाळा, महाविद्यालये, कार्यालय बंद ठेवण्यात आले आहेत. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारतीय दूतावास सतर्क झाले आहे. दूतावासाने बांगलादेशातील भारतीयांसाठी अॅडव्हायझरी जारी केली आहे. भारतीयांनी अनावश्यक प्रवास करू नका, अशा सूचना देण्यात आल्या आहे. तसेच भारतीयांनी बांगलादेशात कोणताही प्रवास टाळावा, असे सल्लागार सूचनेत म्हटलं आहे. दूतावासाने हेल्पलाईन क्रमांकही जारी केला आहे.

हिंसाचाराचं कारण काय?

बांगलादेश मुक्तिसंग्रामात सहभागी झालेल्या कुटुंबातील सदस्यांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देऊ नये, अशी मागणी केली जात आहे. मात्र पंतप्रधान शेख हसीना यांनी आरक्षण संपवण्यास स्पष्ट नकार दिलाय. त्यावरून या देशात आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com