Bangladesh: बांगलादेशात पुन्हा हिंसाचार भडकला; चकमकीत किमान ५० ठार; देशभरात कर्फ्यू जाहीर

Bangladesh Clash: ढाका येथे रविवारी सत्ताधारी अवामी लीगचे समर्थक आणि पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या निदर्शकांमध्ये चकमक झाली. यात किमान ५० जणांचा मृत्यू झाला.
Bangladesh: बांगलादेशात पुन्हा हिंसाचार भडकला; चकमकीत किमान ५० ठार;  देशभरात कर्फ्यू जाहीर
Bangladesh Clash
Published On

बांगलादेशची राजधानी ढाका येथे पुन्हा एकदा निदर्शने सुरू झाली आहेत. सत्ताधारी अवामी लीगचे समर्थक आणि पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्यांमध्ये हिंसाचार उसळला. या हाणामारीत किमान ५० जण ठार झाले तर शेकडो जखमी झालेत. आंदोलक पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याच्या मागणी करत आहेत. हे आंदोलक 'असहकार कार्यक्रमात' सहभागी होण्यासाठी आले होते. त्यावेळी तेथे अवामी लीग, छात्र लीग आणि जुबो लीगच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध केला. त्यानंतर दोन्ही गटामध्ये हाणामारी सुरू झाली.

काही वेळातच वाद वाढला आणि संतप्त लोकांनी रस्त्यावरील वाहने पेटवून दिली. हिंसाचार वाढल्याने बांगलादेशच्या सरकारने पुन्हा एकदा देशव्यापी कर्फ्यू जाहीर केला. तर दुसरीकडे, भारताने बांगलादेशमध्ये राहणाऱ्या आपल्या नागरिकांनाही सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. ॲडव्हायझरीसोबत हेल्पलाइन नंबरही जारी करण्यात आलाय. दरम्यान अनेक महिन्यांपासून बांगलादेशात हिंसाचार सुरू आहे. रविवारी आंदोलकांची अवामी लीग समर्थक आणि पोलिसांशी झटापट झाली. पंतप्रधान शेख हसिना यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलक शांततेत रस्त्यावर उतरले होते, तेव्हा अवामी दलाचे समर्थकांना त्यांना अडवत गोंधळ घातला. त्यावेळी दोन्ही पक्षांमध्ये हाणामारी झाली

देशातील आघाडीच्या बंगाली भाषेतील दैनिक प्रथम आलोच्या वृतानुसार, रविवारच्या हिंसाचारात किमान ४९ लोक मारले गेल्याचं सांगण्यात आले आहे. तर चॅनल २४ ने किमान ५० जणांचा या हिंसाचारात मृत्यू झाल्याचं सांगितलंय. मात्र अहवालात मृत व्यक्तीची ओळख उघड करण्यात आलेली नाही. प्रथम आलो या वृत्तपत्राने आपल्या बातमीत म्हटलं की, “बांगलादेशातील १३ जिल्ह्यांमध्ये दंगा पेटलाय.

ढाका येथील सायन्स लॅब, धानमंडी, मोहम्मदपूर, टेक्निकल, मीरपूर-१०, रामपुरा, तेजगाव, फार्मगेट, पंथपथ, जत्राबारी आणि उत्तरा येथेही निदर्शने आणि रॅली काढण्यात येणार असल्याचे निदर्शनाच्या आयोजकांनी सांगितले. सरकारी नोकऱ्यांसाठी असलेली कोटा पद्धत रद्द करण्याच्या मागणीसाठी बांगलादेशातील विद्यार्थी एका महिन्याहून अधिक काळ आंदोलन केले होते. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामुळे देशभरात हिंसा भडकला आहे.

Bangladesh: बांगलादेशात पुन्हा हिंसाचार भडकला; चकमकीत किमान ५० ठार;  देशभरात कर्फ्यू जाहीर
Bangladesh Violence : बांगलादेशात आरक्षणाविरोधातील हिंसाचारात आतापर्यंत १०५ जणांचा मृत्यू, २४५ भारतीय मायदेशी परतले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com