Pakistan Terrorist Attack: पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये कट्टरतावाद्यांचा हल्ला; १५ जण जागीच ठार, अनेक जखमी

Terrorist Attack News: पाकिस्तानच्या नैऋत्य बलुचिस्तान भागात सोमवारी रात्री उशिरा कट्टरतावाद्यांनी अचानक हल्ला केला. यामध्ये १५ लोकांचा जागीच मृत्यू झाला.
Baloch Attack on Pakistan
Baloch Attack on Pakistan Saam TV
Published On

Baloch Attack on Pakistan

पाकिस्तानच्या नैऋत्य बलुचिस्तान भागात सोमवारी रात्री उशिरा कट्टरतावाद्यांनी अचानक हल्ला केला. यामध्ये १५ लोकांचा जागीच मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झाले. हल्ल्यानंतर दहशतवादी फरार झाले. त्यांना पकडण्यासाठी पाकिस्तानी सुरक्षा दल प्रयत्न करत आहेत. शहरातील सर्व नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Baloch Attack on Pakistan
Bus Accident: प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बसला भरधाव ट्रकची धडक; भीषण अपघातात १९ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

मुख्य बलुच लिबरेशन आर्मीने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. पाकिस्तानी लष्कराच्या इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स एजन्सीने सांगितले की, दहशतवाद्यांनी (Terrorist Attack) दक्षिण-पश्चिम बलुचिस्तान प्रांतातील माच आणि कोलपूर कॉम्प्लेक्सवर हल्ला केला.

या हल्ल्यात १५ लोक ठार झाले. हल्ल्यानंतर कट्टरतावादी पळून गेले. त्यांना शोधण्याचे प्रयत्न सुरू आहे. सध्या आजूबाजूच्या परिसरात सुरक्षा दलांना तातडीने तैनात करण्यात आले आहे. याआधी पाकिस्तानने इराणमधील सिस्तान-बलुचिस्तान प्रांतात कट्टरपंथीयांना लक्ष्य करून हल्ला केल्याचा दावा केला आहे. (Latest Marathi News)

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक पत्रक जारी करून इराणच्या हद्दीतील काही दहशतवादी तळांना काटेकोरपणे लक्ष्य केल्याचं म्हटलं होतं. या हल्ल्याचं सडेतोड उत्तर दिले जाईल, असा इशाराच कट्टरतावाद्यांनी पाकिस्तानला इशारा दिला होता.

दरम्यान, दहशतवाद्यांनी दक्षिण-पश्चिम बलुचिस्तान प्रांतातील माच आणि कोलपूर कॉम्प्लेक्सवर सोमवारी रात्री उशिरा हल्ला केला. यावेळी अंधाधुंद गोळीबार करत स्फोटकही फेकण्यात आली. यात १५ जण ठार झाले. मृतांमध्ये महिला तसेच पुरुषांचा समावेश आहे.

Baloch Attack on Pakistan
Daily Horoscope: सुकर्मा योगामुळे ५ राशीच्या लोकांना मिळणार घवघवीत यश; वाचा आजचे संपूर्ण राशिभविष्य...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com