cctv
cctvsaam tv

CCTV Camera in College Toilets : धक्कादायक! कॉलेजच्या टॉयलेटमध्ये लावले सीसीटीव्ही; कॅमेऱ्याची दिशा चुकल्याने...

उत्तर प्रदेशच्या आजमगडमधून धक्कादायक घटना समोर आली आहे.
Published on

UP News : उत्तर प्रदेशच्या आजमगडमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या डीएवी डिग्रीमध्ये कॉलेजच्या टॉयलेटमध्ये सीसीटीव्ही लावल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे विद्यार्थी चांगलेच भडकले आहे. (Latest Marathi News)

उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) डीएवी डिग्री कॉलेजचं प्रशासन चोरांमुळे भरपूर वैतागलं आहे. टॉयलेटमधील नळ सातत्याने चोरी होत असल्याने चोरांना कसं पकडायचा असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. टॉयलेटमधील नळ चोरी होत असल्यामुळे प्रशासनाने सीसीटीव्ही लावण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, या प्रकारामुळे कॉलेजचे (College) विद्यार्थी चांगलेच भडकले आहे.

cctv
Patna Railway Station: रेल्वे स्टेशनच्या स्क्रीनवर 3 मिनिटे सुरू राहिला अश्‍लील व्हिडिओ! प्रवाशांना लाजीरवाणा अनुभव

कॉलेज प्रशासनाचं काय म्हणणं आहे?

कॉलेजच्या टॉयलेटमध्ये सीसीटीव्ही लावल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यावरून कॉलेज प्रशासनानं म्हणणं आहे की, कॉलेजमध्ये टॉयलेटमधून चोरी होत आहे. त्यामुळे चोरीच्या दृष्टीकोनातून सीसीटीव्ही लावण्यात आले आहे. मात्र, हा सीसीटीव्ही टॉयलेटच्या दिशेने लावायचा नव्हता. तो चुकून चुकीच्या दिशेने वळला गेला आहे.

दरम्यान, कॉलेज प्रशासनाने सीसीटीव्ही कॅमेरे दुसऱ्या ठिकाणी लावण्याचे निर्देश दिले आहे.सीसीटीव्ही आता केवळ कॉलेजच्या गेटजवळ लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

cctv
Viral News: 'अपनी तो जैसे तैसे कट जाएगी...' गाण्यावर डान्स करताना अधिकाऱ्याचा मृत्यू, Video व्हायरल

कॉलेजच्या मुख्याधापकांनी म्हटले आहे की, 'टॉयलेटमधील नळ चोरी वाढत असल्यामुळे आणि ये-जा करणाऱ्या लोकांवर नजर ठेवण्यासाठी कॉलेजने सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, यानंतर आलेल्या तक्रारीनंतर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. कॉलेज प्रशासनाने चूक स्वीकारून विद्यार्थ्यांची नाराजी दूर केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com