Patna Railway Station: रेल्वे स्टेशनच्या स्क्रीनवर 3 मिनिटे सुरू राहिला अश्‍लील व्हिडिओ! प्रवाशांना लाजीरवाणा अनुभव

Patna Railway Station Viral Video: प्लॅटफॉर्म क्रमांक दहावर 9.56 ते रात्री 9.59 या वेळेत केवळ तीन मिनिटे अश्‍लील फिल्म सुरु होती.
Patna Railway Station Viral Video
Patna Railway Station Viral Videosaam tv

Patna Junction Viral Video: बिहारची राजधानी पाटणा येथील रेल्वे स्टेशनवर रविवारी सकाळी ट्रेनची वाट पाहत उभ्या असलेल्या प्रवाशांना लाजीरवाण्या प्रसंगाचा सामना करावा लागला. येथील जंक्शनवर लावलेल्या स्क्रीनवर अचानक जाहिरातीऐवजी अश्लील चित्रपट प्रसारित झाला. यावेळी याठिकाणी आलेल्या प्रवाशांना कुटुंबियांसमोर लाजीरवाना अनुभव आला. ही माहिती तातडीने जीआरपी आणि आरपीएफला देण्यात आली.

आरपीएफने तत्काळ संबंधित एजन्सीला फोन करून स्क्रीनवर जाहिरातीऐवजी अश्लील फिल्म चालू झाल्याची माहिती दिली आणि ती तात्काळ थांबण्यास सांगण्यात आले. त्यानंतर ही फिल्म तात्काळ बंद करण्यात आली . ही फिल्म बंद झाल्यानंतर आरपीएफने कंट्रोल रुमसह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली.

Patna Railway Station Viral Video
Maharashtra Politics: विधानसभेत आदित्य ठाकरेंच्या लग्नाची चर्चा! फडणवीसांच्या कोपरखळीला आदित्य ठाकरेंचा विनोदी पलटवार

या घटनेची माहिती मिळताच विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रभात कुमार यांनी गांभीर्याने दखल घेत संबंधित एजन्सी दत्ता कम्युनिकेशनविरुद्ध आरपीएफ पोस्टमध्ये एफआयआर दाखल केला. कुमार यांनी सांगितले की, याप्रकरणी कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आरपीएफ पोलीस ठाण्यात संबंधित एजन्सीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एजन्सीला दंडही ठोठावला जाईल आणि या एजन्सीला काढून टाकले जाईल आणि ब्लॅक लिस्टमध्ये समावेश केला जाईल. अशी घटना खपवून घेतली जाणार नाही, असेही ते कुमार म्हणाले.

या प्रकरणाबाबत पूर्व मध्य रेल्वेचे (ECR) मुख्य जनसंपर्क अधिकारी वीरेंद्र कुमार यांनी एका निवेदनात सांगितले की, रेल्वे संरक्षण दल (RPF) आणि सरकारी रेल्वे पोलीस (GRP) यांनी संबंधित एजन्सीविरुद्ध प्रत्येकी एक एफआयआर नोंदवला आहे. जीआरपी आणि आरपीएफ या प्रकरणाचा तपास करत आहेत. (Latest Marathi News)

Patna Railway Station Viral Video
Samruddhi Mahamarg Accident Report: समृद्धी महामार्ग बनला मृत्यूमार्ग! 100 दिवसात झाले 900 अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री 9.30 वाजल्यानंतर जंक्शनवर टीव्ही स्क्रीनवर अश्लील फिल्म सुरू झाली. प्लॅटफॉर्म क्रमांक दहावर 9.56 ते रात्री 9.59 या वेळेत केवळ तीन मिनिटे अश्‍लील फिल्म सुरु होती. त्यावेळी सर्व फलाटांवर मोठी गर्दी होती.

शेकडो कुटुंबे स्टेशनवर ट्रेनची वाट पाहत होती. अचानक अश्लील चित्रपट दाखवल्याने त्यांना लाजीरवाना अनुभव आला. या घटनेनंतर जाहिरात एजन्सीच्या कंट्रोल रुमव छापा टाकला असता तेथील कर्मचारी अश्लील चित्रपट पाहताना आढळून आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com