Jai Shree Ram: भव्य राम मंदिराचं काम प्रगतीपथावर; नयनरम्य फोटोंमधून होईल रामलल्लाचं दर्शन, पाहा सुंदर Photos

Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra Photos: रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे सरचिटणीस चंपत राय हे नेहमी सोशल मीडियावर राम मंदिराच्या निर्माण कार्याचे फोटोज शेअर करून भाविकांची उत्सुकता वाढवत असतात.
Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra
Shri Ram Janmbhoomi Teerth KshetraTwitter/@ShriRamTeerth
Published on
Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra
Shri Ram Janmbhoomi Teerth KshetraTwitter/@ShriRamTeerth

रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे सरचिटणीस चंपत राय हे नेहमी सोशल मीडियावर राम मंदिराच्या निर्माण कार्याचे फोटोज शेअर करून भाविकांची उत्सुकता वाढवत असतात.शनिवारी त्यांनी ट्विटरवर राम मंदिराच्या निर्माण कार्याची आणि भविष्यात राम मंदिर कसे असेल याची सुंदर छायाचित्रे शेअर केली.

Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra
Shri Ram Janmbhoomi Teerth KshetraTwitter/@ShriRamTeerth

मंदिराच्या गर्भगृहात 160 खांब बसवण्यात येणार आहेत. जो मंदिराचा आधार असेल. मंदिराच्या पहिल्या मजल्यावर 132 खांब असतील. त्याचबरोबर दुसऱ्या मजल्यावर 74 खांब बसवण्यात येणार आहेत.

Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra
Shri Ram Janmbhoomi Teerth KshetraTwitter/@ShriRamTeerth

भव्य राम मंदिरात एकूण 12 दरवाजे असतील. हे सर्व दरवाजे सागवान लाकडाचे असतील. जानेवारी 2024 पासून भाविकांना रामललाचे भव्य मंदिरात दर्शन घेण्यास सुरुवात होणार आहे.

Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra
Shri Ram Janmbhoomi Teerth KshetraTwitter/@ShriRamTeerth

राम मंदिराच्या उभारणीसाठी १८०० कोटी रुपये खर्च होऊ शकतात. राम मंदिराचे बांधकाम 2023 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. डिसेंबर २०२३ पर्यंत ते तयार होण्याची अपेक्षा आहे. जानेवारी 2024 पर्यंत (मकर संक्रांती) राम मंदिरात प्रभू राम लल्लाच्या प्रतिमेची पूजा केली जाईल अशी अपेक्षा आहे.

Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra
Shri Ram Janmbhoomi Teerth KshetraTwitter/@ShriRamTeerth

यावेळी त्यांनी भविष्यातील राम मंदिराची सुंदर छायाचित्रे शेअर केली, ज्यात आठ एकरवर बांधलेल्या रामलल्लाच्या मंदिराचे चित्रण आहे.

Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra
Shri Ram Janmbhoomi Teerth KshetraTwitter/@ShriRamTeerth

उत्तर भारतातील नगारा शैलीतील या मंदिराची इमारत आठ एकरमध्ये बांधली जात आहे. यात रामलल्ला अगदी मध्यभागी बसलेले आहेत.

Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra
Shri Ram Janmbhoomi Teerth KshetraTwitter/@ShriRamTeerth

रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे विश्वस्त डॉ. अनिल मिश्रा सांगतात की, मंदिर परिसर आणि उद्यान यांच्यामध्ये 27-27 मीटर इतकीच जागा सोडण्यात आली आहे.

Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra
Shri Ram Janmbhoomi Teerth KshetraTwitter/@ShriRamTeerth

आतापर्यंत राम मंदिराच्या उभारणीचे ४५ टक्के काम पूर्ण झाले आहे. राम लल्लाच्या गर्भगृहाचे बांधकाम वेगाने सुरू आहे. अष्टकोनी गर्भगृहात आतापर्यंत पाचशे मोठमोठे दगड टाकण्यात आले आहेत.

Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra
Shri Ram Janmbhoomi Teerth KshetraTwitter/@ShriRamTeerth

राम मंदिर तीन मजल्यांचे असेल. तळमजल्यावर रामलल्ला विराजमान होणार असून पहिल्या मजल्यावर राम दरबाराचे दर्शन होणार आहे, तर तिसऱ्या मजल्यावर सुरक्षेसाठी सर्वसामान्यांना प्रवेश बंदी असेल.

Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra
Shri Ram Janmbhoomi Teerth KshetraTwitter/@ShriRamTeerth

राम मंदिराचे शिखर १६१ फूट उंच आहे. मंदिरातील गर्भगृहाव्यतिरिक्त, अनुक्रमे गुणमंडप, रंगमंडप नृत्यमंडप आणि सिंहद्वार असे वेगवेगळे भाग आहेत. मंदिराची लांबी 365 फूट आणि रुंदी 280 फूट आहे. मंदिरात 380 खांब असतील, ज्यावर 16-16 मूर्ती कोरलेल्या असतील.

Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra
Shri Ram Janmbhoomi Teerth KshetraTwitter/@ShriRamTeerth

कॅम्पसमध्ये हिरवीगार हिरवळ विकसित करण्यात आली असून त्यामध्ये ५० हजार भाविक एकत्र येऊन दर्शन घेऊ शकतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com