Ayodhya Ram Mandir: अयोध्येत आता 'या' लोकांना आणि वाहनांना नो एन्ट्री; सुरक्षेसाठी २० हजार जवान तैनात

Ayodhya Ram Mandir Security: अयोध्येतील रामलल्लाच्या अभिषेक सोहळ्याला आता फक्त १ दिवस उरला आहे. या भव्य सोहळ्यासाठी राम मंदिर फुलांनी आणि विशेष दिव्यांनी सजवण्यात आलंय. संपूर्ण शहर धार्मिक उत्साहाने भरलेलं आहे. भाविक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत.
 Ram Mandir Security
Ram Mandir SecuritySaam Tv
Published On

Ram Mandir Prana Pratishtha Utsav Security

अयोध्येत (Ayodhya) 22 जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir Prana Pratishtha Utsav) सोहळ्यासाठी सर्व तयारी अंतिम टप्प्यात आलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशातील अनेक दिग्गज व्यक्ती या उद्घाटन सोहळ्याचा भाग असणार आहेत. यासाठी रामनगरीत कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. शहरात बाहेरील व्यक्ती आणि वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली असून, स्थानिकांना बाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलंय. येथील प्रत्येक एन्ट्री पॉइंटवर पोलीस आणि एटीएस कमांडो तैनात करण्यात आले आहेत. (latest ram mandir update)

उच्च सुरक्षा

मुख्य स्थळी तसेच प्रत्येक कोपऱ्यावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलीय. शनिवारपासून पुढील तीन दिवस बाहेरील लोकांना अयोध्येत (Ram Mandir) येण्यास बंदी घालण्यात आली आहे. अयोध्या धाम आणि शहरात राहणाऱ्या लोकांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्याची मुभा असली तरी त्यासाठी त्यांना त्यांचे ओळखपत्र दाखवणे बंधनकारक असेल. अयोध्या धाम (Ayodhya) 20 ते 22 जानेवारीपर्यंत उच्च सुरक्षा क्षेत्रात राहील. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वाहनांना प्रवेश बंदी

अयोध्या धाम येथील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात (Ram Mandir) अमिताभ बच्चन, मुकेश अंबानी, गौतम अदानी आणि सचिन तेंडुलकर यांच्यासह मोठ्या संख्येने संत, भाविक आणि सुमारे 8 हजार सेलिब्रेटींचे आगमन झालंय. त्यामुळे 20 जानेवारी रोजी रात्री 8 वाजल्यापासून मार्ग वळवण्यात आला आहे. शनिवारपासून शहरात बाहेरील वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आलीय. तसेच, आता केवळ येथे राहणारे लोक, सरकारी वाहने किंवा आपत्कालीन वाहनांनाच शहरात प्रवेश दिला जाणार आहे. केवळ परवानगी असलेली वाहनेच आत (Ayodhya) प्रवेश करू शकतील.

वाहनांची आवश्यक प्रमाणपत्रेही सोबत ठेवावी, असं पोलिसांकडून सांगण्यात आलंय. उद्या चौक, नया घाट आणि साकेत पेट्रोल पंपासह इतर अनेक प्रवेश स्थळांवर बाहेरून येणारी वाहने थांबवून त्यांची तपासणी केली जाईल. राममंदिर स्थळ (Ram Mandir Prana Pratishtha Utsav) आणि लता मंगेशकर चौक अशा अनेक महत्त्वाच्या भागात बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. या भागात (Ayodhya) वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आलीय. येथील अधिकारी अनेक प्रमुख व्यक्तींसह मोठ्या संख्येने लोकांच्या मेजवानीची तयारी करत आहेत.

स्थानिक लोकांना घरात राहण्याचं आवाहन

अयोध्या (Ram Mandir Prana Pratishtha Utsav)धाममध्ये राहणार्‍या लोकांना पुढील 3 दिवस त्यांच्या घरी जाण्याची परवानगी असेल. तसेच जिल्ह्यातील इतर ठिकाणांहून अयोध्या कॅन्ट परिसरात येणाऱ्या लोकांना येण्यापासून रोखले जाणार नाही. मात्र, त्यासाठी त्यांना वळवलेल्या मार्गाचा वापर करावा लागणार आहे. स्थानिक लोकांनी 21 आणि 22 जानेवारी रोजी घराबाहेर पडू नये, जेणेकरून त्यांना अडचणींना सामोरे जावे लागू नये, असं आवाहन प्रशासनाने केलंय. प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहनही करण्यात आलं.

SPG-CRPF देखील सुरक्षेत तैनात

अयोध्या धाममध्ये (Ram Mandir) सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आलीय. अधिकाऱ्यांच्या दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय सुरक्षा एजन्सी तसेच राज्य सुरक्षा आणि पोलीस एजन्सीमधील 20 हजाराहून अधिक अधिकारी आणि सुरक्षा कर्मचारी सुरक्षा व्यवस्थेत सामील झाले आहेत. तसेच कार्यक्रमादरम्यान हवाई धोक्यांचा सामना करण्यासाठी ड्रोनविरोधी यंत्रणा बसवण्यात आली आहे. स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG), नॅशनल सिक्युरिटी गार्ड (NSG), केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) पॅरा कमांडो, यूपी अँटी टेररिस्ट स्क्वॉड (ATS) आणि UP स्पेशल टास्क फोर्स (STF) यासह अनेक एजन्सींचा सहभाग आहे. PAC आणि UPSSF सोबत इंटेलिजन्स ब्युरोची टीमही सुरक्षेसाठी तैनात आहे. सुरक्षेसाठी AI देखील वापरली जाणार आहे. शनिवारी यूपीच्या दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) जवान रस्त्यावर (Ayodhya) गस्त घालताना दिसले. यूपी पोलिसांनी कार्यक्रमासाठी 3 डीआयजी तैनात केले आहेत. यासोबतच 17 आयपीएस आणि 100 पीपीएस दर्जाचे अधिकारीही येथे सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय 325 निरीक्षक, 800 उपनिरीक्षक आणि 1000 हून अधिक हवालदारही तैनात करण्यात आले आहेत.

 Ram Mandir Security
Ayodhya Ram Mandir: काश्मीरच्या मुस्लीम बांधवांनी रामलल्लासाठी पाठवले खास केसर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com