Ram Mandir: राम मंदिराला सोन्याचा दरवाजा; १००० वर्षापर्यंत खराब होणार नाही, पहिला फोटो आला समोर

Golden Gate of Ram mandir: अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या राम मंदिराचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. या भव्यदिव्य मंदिराची देशभर चर्चा सुरु आहे. या मंदिरासाठी दिवसरात्र कर्मचारी काम करत आहेत.
Golden Gate of Ram mandir
Golden Gate of Ram mandirSaam tv
Published On

Ram Mandir Golden Gate:

अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या राम मंदिराचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. या भव्यदिव्य मंदिराची देशभर चर्चा सुरु आहे. या मंदिरासाठी दिवसरात्र कर्मचारी काम करत आहेत. या मंदिराला सुवर्ण जडीत दरवाजा लावण्यात येणार आहे. मंदिराला असे एकूण १४ सुवर्णजडीत दरवाजे लावण्यात येणार आहेत. (Latest Marathi News)

मीडिया रिपोर्टनुसार, हैदराबादच्या अनुराधा टिंबर इंटरनॅशनल कंपनीच्या कारागीरांनी राम मंदिरासाठी सुवर्णजडीत दरवाजे तयार केले आहेत. हैदराबादच्या कंपनीचे मालक शरद बाबू यांनी माध्यमांशी संवाद साधत या मंदिराच्या दरवाज्याच्या कामाविषयी माहिती दिली. शरद बाबू यांनी सांगितलं की, 'राम मंदिराचे दरवाजे नागर शैलीत तयार करण्यात आले आहेत. आमच्या कारागीरांना दरवाजा तयार करण्याचा चांगला अनुभव आहे'. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Golden Gate of Ram mandir
Ram Mandir Ayodhya: राम मंदिरावर वक्तव्य करणे टाळा, श्रद्धा दाखवा पण...'; PM मोदींकडून मंत्र्यांना कानमंत्र

सुवर्णजडीत दरवाज्याविषयी बोलताना शरद बाबू यांनी सांगितलं की, राम मंदिरासाठी १४ सुवर्णजडीत दरवाजे सोमवारी रामनगरीत पोहोचले आहेत. या मंदिराच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. तर मंदिर परिसरातही चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. या सुवर्णजडीत दरवाजे लावण्याचं काम १५ जानेवारीपासून सुरु होईल. दरवाजा लावण्याचं काम लोकार्पण सोहळ्याच्या आधी पूर्ण होईल'.

दरवाजा १००० वर्ष खराब होणार नाही

मंदिराला लावण्यात येणाऱ्या दरवाजांसाठी महाराष्ट्रातून सागवानचे लाकडे आणण्यात आल्याची माहिती आहे. दरवाजांसाठी विशेष सागवानच्या लाकडांचा वापर करण्यात आला आहे. सुवर्णजडीत दरवाजे १००० वर्षे खराब होणार नाहीत, असा दावा कंपनीच्या मालकाने केला आहे.

Golden Gate of Ram mandir
Ram Mandir Inauguration: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येला जाणार; श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण आलं

कन्याकुमारीतून आले कारागीर

शरद बाबू यांनी सांगितलं की, 'सुवर्णजडीत दरवाजासाठी गेल्या ६ महिन्यांपासून दिवसरात्र काम सुरु आहेत. या कामासाठी ६० कारागीर काम करत आहेत. शिफ्टनुसार हे कर्मचारी काम करत आहेत. कमी कालावधित अधिक काम करणे एका मोठ्या आव्हानापेक्षा कमी नाही. श्रीरामाच्या कृपेने काम वेळेत पूर्ण होत आहे'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com