Aviation Career: आता घ्या उंच भरारी! आर्ट्स कॉमर्सचे विद्यार्थीही होणार पायलट |VIDEO

Aviation Career Education : पायलट होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता आर्ट्स आणि कॉमर्सचे विद्यार्थीदेखील पायलट होऊ शकणार आहेत.
Aviation Career
Aviation CareerSaam Tv
Published On

आता पायलट होऊन विमान उडवणं सहज शक्य होणारेय. डीजीसीएनं एक मोठा निर्णय घेतला असून हा निर्णय अनेक विद्यार्थ्यांची स्वप्न पुर्ण करणारा ठरु शकतो पाहूयात, आता आर्ट्स आणि कॉमर्स शाखेतून शिक्षण घेणारे विद्यार्थीही पायलट होणार आहेत. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Aviation Career
11th Admission: या विद्यार्थ्यांना मिळणार नाही अकरावीत प्रवेश; बोर्डाने दिली महत्त्वाची अपडेट

आर्ट्स, कॉमर्सचे विद्यार्थीही होणार पायलट

विमान चालवण्याचं, आकाशात उंच भरारी घेण्याचं स्वप्न अनेक जण बघतात. मात्र हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बारावी सायन्स शाखेतून शिक्षण घेणं.. ही महत्त्वाची अट होती. ज्यामुळे आर्टस आणि कॉमर्स शाखेतील विद्यार्थी या क्षेत्रापासून वंचित राहायचे. मात्र आता ही परिस्थिती बदलणार आहे. हवाई वाहतुकीचं नियमन करणाऱ्या भारताच्या सर्वोच्च संस्था DGCAनं एक महत्त्वपूर्ण शिफारस केलीय. ज्यामुळे आता आर्ट्स आणि कॉमर्स शाखेतील विद्यार्थ्यांनाही पायलट होता येणारेय.

आर्ट्स, कॉमर्सचे विद्यार्थीही होणार पायलट

  • पायलट प्रशिक्षण केवळ सायन्स शाखेतील विद्यार्थ्यांसाठीच मर्यादित

  • इतर शाखेतील विद्यार्थ्यांना ओपन स्कूलिंगद्वारे फिजिक्स, मॅथ्सचे पेपर देऊन पात्रता मिळवावी लागत होती

  • विज्ञान शाखेची अट रद्द करण्यासाठी डीजीसीएचा नागरी उड्डयन मंत्रालयाला प्रस्ताव

  • मंजुरी मिळाल्यास कुठल्याही शाखेतील 12वी उत्तीर्ण विद्यार्थी पायलट प्रशिक्षणासाठी अर्ज करू शकणार

  • महिलांसह ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांसाठी एव्हिएशन करिअरचे दरवाजे खुले होणार

Aviation Career
11th Admission: अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! प्रवेशप्रक्रियेसाठी मुदतवाढ | VIDEO

डीजीसीएने या प्रस्तावाला हिरवा कंदील दिल्यानंतर विमान वाहतूक मंत्रालयाच्या अंतिम निर्णयाची अपेक्षा आहे. देशांतर्गत विमानसेवा वाढत असताना प्रशिक्षित पायलटची मागणीही वाढत आहे. जर ही शिफारस मंजूर झाली, तर पायलट होण्याचं प्रशिक्षण घेणं सोप्प होईल. यामुळे भारतातील प्रशिक्षित पायलटची वाढती मागणीही पूर्ण होईल आणि अनेकाचं आकाशी विहार करण्याचं स्वप्नही पूर्ण होईल.

Aviation Career
11th Admission Process: अकरावीच्या विद्यार्थ्यांचं टेन्शन वाढलं! वेबसाइट ४ दिवस बंद| VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com